... तर जेम्स अँडरसनवर कारवाई व्हायला हवी 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 14 July 2020

इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडीज यांच्यातील कसोटी सामन्यात इंग्लंडचा गोलंदाज जेम्स अँडरसनकडून चूक झाली आहे, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद त्याच्यावर कारवाई करण्याची शक्‍यता आहे. या सामन्यातील जेम्स अँडरसन याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला

लंडन : इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडीज यांच्यातील कसोटी सामन्यात इंग्लंडचा गोलंदाज जेम्स अँडरसनकडून चूक झाली आहे, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद त्याच्यावर कारवाई करण्याची शक्‍यता आहे. या सामन्यातील जेम्स अँडरसन याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला, त्यात चेंडूला चकाकी आणण्यासाठी अँडरसन चेंडूला काहीतरी लावतानाचा तो व्हिडीओ आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर आयसीसीच्या नव्या नियमानुसार चेंडूला चकाकी आणण्यासाठी लाळ किंवा थुंकीचा वापर करण्यास मनाई करण्यात आली आहे.

दरम्यान, एका युझरने अँडरसनचा व्हिडीओ ट्‌विट करून दावा केला की, "जर अँडरसनने चेंडूला थुंकी लावली असेल तर त्याच्यावर कारवाई व्हायला हवी', परिणामी तो नक्की काय लावतो आहे हे त्या व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसू शकलेले नाही. त्यामुळे एका नव्या वादाला तोंड फुटले आहे. दरम्यान, कोरोना विषाणूच्या थैमानानंतर झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात पाचव्या दिवशी वेस्ट इंडीजने इंग्लंडवर 4 गडी राखून विजय मिळवला. 200 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना चौथ्या डावात जेरमाइन ब्लॅकवूडने दमदार 95 धावांची खेळी करत संघाला तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 ची आघाडी मिळवून दिली आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News