... म्हणून अभिषेक मानले ट्विटरवरून चाहत्यांचे आभार 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 28 July 2020

अभिनेत्री ऐश्‍वर्या राय-बच्चन आणि आराध्या यांना आज नानावटी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.

मुंबई:  अभिनेत्री ऐश्‍वर्या राय-बच्चन आणि आराध्या यांना आज नानावटी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. अभिषेक बच्चन याने ट्विटरवरून ही माहिती दिली. चाहत्यांनी त्यांच्या आरोग्यासाठी केलेल्या प्रार्थनेबद्दल त्याने आभारही मानले असून सध्या अमिताभ बच्चनसह आपणही रुग्णालयातच असून उपचार घेत असल्याचे सांगितले आहे.

गेल्या 11 जुलै रोजी अमिताभ आणि अभिषेक बच्चनला रुग्णालयात दाखल केले होते. त्याच्या काही दिवसांनीच ऐश्‍वर्या आणि आराध्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांना दाखल करण्यात आले होते. आज ऐश्‍वर्या राय-बच्चन आणि आराध्या यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. दोघीही जलसा बंगल्यावर पोहोचल्या आहेत. दरम्यान, माझे वडील आणि माझी प्रकृती सुधारत असून चाहत्यांनी केलेल्या प्रार्थनेबद्दल मी कायम त्यांचे ऋणी राहीन, असे अभिषेकने म्हटले आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News