...म्हणून 80 मुलींनी घेतला एकाच वेळी केशदान करण्याचा निर्णय

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 6 March 2020

महिलांच्या चेहऱ्यावरचे हास्य फुलवण्यासाठी महाविद्यालयीन तरुणींनी केस दान करण्याचा आगळा वेगळा निर्णय घेतला.

कोयंबटूर: कर्करोगाने ग्रासलेल्या रुग्णांना अनेक तपासण्यामधून सामोरी जावे लागते. केमोथेरपी उपचार पद्धीतीमुळे डोक्यावरचे सर्व केस गळून जातात तेव्हा रुग्ण कुरुप दिसायला लागतो, लहान पणापासून वाढवलेले केस जेव्हा गळून जातात तेव्हा महिलांच्या चेहऱ्यावर हास्य कोमजून जाते. महिलांच्या चेहऱ्यावरचे हास्य फुलवण्यासाठी महाविद्यालयीन तरुणींनी केस दान करण्याचा आगळा वेगळा निर्णय घेतला. तरुणींने घेतलेल्या निर्णयाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

ज्या समाजात आपण जन्म घेतो त्या समाजाचे काही देणे लगतो या दृष्टीकोणातून तामिळनाडू राज्यातल्या कोयंबटूर शहरातील महाविद्यालयीन तरुणींनी कर्करोग ग्रस्थांसाठी केशदान करण्याचा महत्त्वपुर्ण निर्णय घेताल. 80 मुलींनी एकत्र येऊन आपले केशदान केले. दान केलेल्या केसांपासून बनावच केस बनवले जातील. बनावच केल कर्करोग्रस्थ महिलांना बसवून त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फलवले जातील.   

विद्यार्थी दशेत असल्यामुळे आमच्याकडे आर्थिक सोर्स नाहीत. अच्छा असूनही आम्ही आर्थिक मदत करु शकत नाही, त्यामुळे केशदान करुन कर्करोग ग्रस्थांना मानसीक मदत करण्याचा प्रयत्न केला असे मत महाविद्यालयीन तरुणींनी व्यक्त केले.  

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News