घरात सिलेंडरसोबत साप आला आणी झालं असं...

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Sunday, 30 August 2020

घरात सिलेंडरसोबत साप आला आणी झालं असं...

घरात सिलेंडरसोबत साप आला आणी झालं असं...

आपल्याला रस्त्याने जाताना साप दिसला तरी आपण जाग्यावर थांबतो, परंतु तुमच्या घरी साप आल्यानंतर तुमची काय अवस्था होईल याचा विचार तुम्ही कधी केलाय का ? हा धक्कादायक प्रकार घडला आहे हरियाणातील फतेहाबादमध्ये, सिलेंडरसोबत आलेला साप दिसल्यामुळे घरात खळबळ उडाली. तो साप सिंलेडरच्या खालच्या बाजूला लपून बसला होता.

ही घटना घडल्यामुळे परिसरात घबराहट पसरली आहे. लोक सिलिंडर तपासून घेत आहेत. सिलेंडरच्या डिलिव्हरीसोबत साप आला, तो पलटी केल्यानंतर खालच्या बाजूला असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे घरचे सगळे सदस्य घाबरले. तात्काळ सर्पमित्र डॉ. गोपी यांना या घटनेची माहिती देण्यात आली. सर्वमित्राने तो साप पकडला आणि जंगलात सोडून दिला.

अनेकदा पावसामुळे साप लपण्यासाठी चांगली जागा शोधतो, सापाला तिथं सिलेंडरची जागा योग्य वाटल्यामुळे तो तिथं शिरला होता. पण याच्यापुढे प्रत्येकांनी आपला सिलेंडर चेक करून घ्यावा, जेणेकरून तुमच्या जीवाला कोणताही धोका निर्माण झाला नाही पाहिजे, असं सर्पमित्र डॉ. गोपी यांनी सांगितले.

अशा देशात अनेक ठिकाणी घटना घडल्या आहेत, महाराष्ट्रातील वाशिममध्ये सिलेंडरच्या खालच्या बाजूला साप आढळून आला होता. प्रत्येकवेळी सिलेंडरची योग्य तपासणी करून घ्या, काही अडचणी असल्यास तात्काळ संबंधिक व्यक्तिशी संपर्क साधा.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News