स्मिता देणार महिला सशक्तीकरणाचे धडे 

यिनबझ ऑनलाईन टीम
Tuesday, 26 February 2019

अभिनेत्री स्मिता तांबेच्या प्रत्येक भूमिकेला सिनेरसिकांनी उत्तम दाद दिली. आता स्मिता ‘सावट’ या मराठी चित्रपटाची निर्मिती करत आहे. या चित्रपटाद्वारे महिला सशक्तीकरणाचे धडे ती प्रेक्षकांना देणार आहे.

‘निरक्ष फिल्म्स’ आणि ‘लेटरल वर्क्‍स प्रा लि.’बरोबर स्मिताचं ‘रिंगिंग रेन’ प्रॉडक्‍शन हाऊस या चित्रपटाची निर्मिती करत आहे. हा एक सुपरनॅचरल थ्रिलर चित्रपट आहे. स्मिता यामध्ये अभिनय करतानाही दिसणार आहे.

इन्स्पेक्‍टर आदिती देशमुखच्या भूमिकेत ती दिसेल. स्मिता सांगते, ‘मराठीतील सशक्त स्त्री-व्यक्तिरेखांनी कायम माझं मन जिंकलं आहे. म्हणूनच कायम मला सशक्त महिलांच्या भूमिका आकर्षित करत राहिल्या. माझी या चित्रपटातील भूमिकाही सशक्त, हुशार पोलिस अधिकाऱ्याची आहे.’ तिचं धाडसी रूप येत्या २२ मार्चला प्रेक्षकांसमोर येणार आहे.  
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News