5 कॅमेरे, 6000mAh बॅटरी क्षमता असलेला स्मार्टफोन सर्वसामान्यांच्या बजेटमध्ये

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 27 August 2020

सर्वसामान्य ग्राहकांच्या बजेटमध्ये बसणारा रियलमी कंपनीचा C12 आणि C15 दोन स्मार्टफोन भारतामध्ये गेल्या आठवड्यात लॉन्च करण्यात आले.

लॉकडाऊन काळात ई-कॉमर्स व्यवसायाला उतरती कळा लागली मात्र, सरकारने ई-कॉमर्स व्यवसाय पुन्हा सुरू केल्यानंतर मोबाईल कंपनीने भन्नाट ऑफर द्यायला सुरुवात केली. सर्वसामान्य ग्राहकांच्या बजेटमध्ये बसणारा रियलमी कंपनीचा C12 आणि C15 दोन स्मार्टफोन भारतामध्ये गेल्या आठवड्यात लॉन्च करण्यात आला. C12 स्मार्टफोन गेल्या आठवड्यापासून विक्रीसाठी उपलब्ध आहे, त्यानंतर C15 हा आधुनिक तंत्रज्ञानाचा स्मार्टफोन आजपासून ई- कॉमर्स प्लॅटफॉर्मवर ग्राहकांना उपलब्ध होणार आहे. मोबाईलच खास वैशिष्ट्य म्हणजे 6000 एमएएच बॅटरी क्षमता आणि 5 कॅमेरे देण्यात आले आहेत. त्याचबरोबर सर्वसामान्य ग्राहकांना परवडेल अशी किंमत ठेवण्यात आली. 

फ्लिपकार्टने आपल्या ग्राहकांसाठी ऍक्सिस बँक क्रेडिट कार्ड आणि अॅक्सिस बँक बझ क्रेडिट कार्डद्वारे स्मार्टफोन खरेदी केल्यास पाच टक्के सवलत मिळणार आहे, त्याचबरोबर एक्सचेंज ऑफरमध्ये हा फोन खरेदी केल्यास सहा महिने गुगल वन ट्रायल फ्री मिळणार आहे. 

रियलमी सी15 फीचर्स 

स्मार्टफोनमध्ये ड्युअल सिम कार्ड सपोर्ट देण्यात आले. तसेच 6.5 इंचीचा डिस्प्ले आहे, स्किनच्या सुरक्षिततेसाठी कॉर्णींग गोरिल्ला ग्लास आहे. हा फोन दहा ऑपरेटिंग सिस्टम प्रणालीवर चालणार आहे. ऑक्टाकोयर मीडियाटेक हिलीओ G35 प्रोसेसर देण्यात आले. ग्राफिक्स जीई8320 जीपीयु आहे. 3 जीबी रॅम आणि 32 जीबी इंटरनल स्टोरेज, 4 जीबी रॅम आणि 64 जीबी इंटरनल स्टोरेज अशा दोन प्रकारांमध्ये हँडसेट लॉन्च करण्यात आला.

फोटो काढण्यासाठी मुख्य कॅमेरा 13 मेगापिक्सलचा, दुसरा कॅमेरा 8  मेगापिक्सल, तिसरा  आणि चौथा दोन मेगापिक्सलचे एकूण 4 रिअर कॅमेरे देण्यात आले आहेत. त्या सोबत सेल्फीसाठी 8 मेगापिक्सलचा स्पेशल कॅमेरा देण्यात आला. वाय-फाय, ब्लूटूथ, हेडफोन जॅक कनेक्टिव्हिटीसाठी देण्यात आले, महत्त्वाचे म्हणजे 6000एमएएच क्षमता असलेली पावरफूल बॅटरी देण्यात आली. ही बॅटरी 18 व्हॉटवर फास्ट चार्ज होईल, पावर निळा आणि पावर सिल्वर अशा दोन कलरमध्ये स्मार्टफोन उपलब्ध आहेत. 3 जीबीचा फोन 9 हजार 999 तर 4 जीबीचा 10 हजार 999 रुपयाला उपलब्ध आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News