स्मार्टफोन स्लो चालतोय; असा शोधा व्हायरस 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 8 August 2020

अनेकांना आपल्या मोबाईलमध्ये असलेला व्हायरस कसा शोधावा याची माहिती नसते, त्यामुळे मोबाईल ला मोठ्या प्रमाणात हानी होण्याची शक्यता असते. व्हायरस शोधन्याच्या काही खास टिप्स आम्ही सांगणार आहोत.

दिवसेंदिवस स्मार्टफोनचा वापर वाढत आहे. त्यामुळे मोबाईलमध्ये अनेक समस्या निर्माण होत आहेत. त्यातील सर्वांत मोठी समस्या व्हायरस आहे. व्हायरसमुळे मोबाईल हॅंग होतो त्याचबरोबर स्मार्टफोन मधील माहिती नष्ठ होऊ शकते. वेळेवर व्हायरसचा उपाय केला नाही तर संपुर्ण डिव्हाईस खराब होऊ शकतो. अनेकांना आपल्या मोबाईलमध्ये असलेला व्हायरस कसा शोधावा याची माहिती नसते, त्यामुळे मोबाईल ला मोठ्या प्रमाणात हानी होण्याची शक्यता असते. व्हायरस शोधन्याच्या काही खास टिप्स आम्ही सांगणार आहोत.

अधिक डाटा खर्च होणे : सर्वसामान्य वेळेपेक्षा मोबाईलचा डाटा अधिक खर्च होत असेल तर त्याकडे नजर अंदाज करू नये कारण मोबाईल मध्ये व्हायरस असण्याची शक्यता अधिक असते. मोबाईल मध्ये अॅटीव्हायरस इन्स्टॉल करून व्हायरस स्कॅन करुन घ्यावा. त्यामुळे मोबाईल खराब होण्यापासून वाचू शकतो. 

टेक्स मॅसेजसाठी अधिक रक्कम मोजावी लागणे: युजर्स पोस्टपेड कनेक्शन वापरत असेल तर त्यांना टेक्स मेसेजचे बिल अधिक येते. अशा वेळी स्मार्टफोनमध्ये व्हायरस असल्यामुळे ही समस्या उद्भवते. त्यामुळे प्रीमियर रक्कमेत एसएमएस पाठवले जात नाही. एक स्पेशल नंबर असतो त्यावर मॅसेज पाठवल्यास अधिक रक्कम लागते.

स्मार्टफोन गरम होणे: स्मार्टफोन करम होणे हे व्हायरसचे लक्षण आहे. फोनवर बोलताना, मेसेज करताना नेहमीपेक्षा अधिक स्मार्टफोन गरम होत असेल तर त्यामध्ये व्हायरस असण्याची शक्यता आहे. अशा वेळी मोबाईल कस्टरम केअर सेंटरला दाखवावे, त्यामुळे मोठ्या अपघातापासून बचाव होईल.

मोबाईलचे स्पीड कमी होणे: मोबाईल हा पूर्वीसारखा चालत नसेल, त्याची प्रोसेसर स्पीड कमी झाली असेल तर मोबाईल मध्ये वायरस असू शकतो. अशावेळी मोबाईल मध्ये ब्राउजिंग, टेक्स्ट मेसेज, कॅमेरा स्लो चालतो ही व्हायरसची लक्षणे आहेत. त्यामुळे सर्वप्रथम व्हाट्सअॅप अनइन्स्टॉल करावे. त्यामुळे स्मार्टफोन सुरक्षित सुरक्षित राहतो. 

बॅटरी अधिक खर्च होणे:  स्मार्टफोन मध्ये असणारी बॅटरी काही वेळातचं चार्जिंग कमी होतो. मोबाईल मध्ये व्हायरस अशी समस्या निर्माण होते. त्यामुळे डिव्हाईस खराब होऊ शकत. डिव्हाईसमध्ये अँटीव्हायरस अपलोड करून मोबाईल क्लीन करावा. मोबाईल मध्ये समस्या निर्माण झाल्यास वेळेवर फॉर्मेट करणे आवश्यक आहे. समस्यांकडे दुर्लक्ष केल्यास संपूर्ण माहिती लिक होऊ शकते.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News