आपल्या शरीरासाठी वेळेत जेवण आणि झोप या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. उपाशी राहिल्यास काम करण्याची क्षमता आणि काम या दोन्ही गोष्टींवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. काहीजणांना आजही वाटते की, उपाशी किंवा काही न खाता झोपल्याने वजन कमी होते. मात्र याचे शरीरावर दुष्परिणाम होतात. त्यामुळे उपाशी राहून वजन कमी करणे ही नक्कीच चांगली संकल्पना नाही.
अनेक डॉक्टर तसेच डायटेशियनच्या माहितीनुसार, उपाशी पोटी झोपण्यापेक्षा रात्री लवकर झोपणे वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरू शकते. ज्यांना रात्री झोप येत नाही, त्यांच्यासाठी काही चांगले पदार्थ आहेत, ज्यांचे सेवन केल्यास रात्री लवकर झोप येण्यास मदत मिळेल. झोपण्यापूर्वी चेरी, दूध, केळे, बदाम, उकडलेले अंड, हर्बल टी,इत्यादी पदार्थांचे सेवन करू शकता. रात्री झोपण्यापूर्वी यातील काही तासांपूर्वी हे पदार्थ खा. त्यामुळे भूक नियंत्रणात राहते, याशिवाय झोपही चांगली येईल. मात्र उपाशी पोटी झोपल्यास आरोग्यावर मोठे दुष्परिणाम होतील.
वजनात वाढ
जर वजन कमी करण्यासाठी रात्रीचे जेवण तुम्ही सोडले असेल तर त्याचा फायदा होण्याऐवजी तोटा होईल. रिकाम्या पोटी झोपल्याने जास्त भूक लागते आणि जर तुम्ही सकाळी भरपेट खाल्ले तर तुम्हाला जास्त खाण्याचा त्रास होईल. भूक वाढल्यामुळे साखरेची पातळी कमी होते. हे चयापचयवर परिणाम करते. यामुळे वजन वाढते.
ऊर्जेची कमतरता
जर आपण खाल्ले नाही तर दिवसा आपल्या कामात सक्रिय राहण्यासाठी शरीरात कोणतेही 'इंधन' नसते. हा जुना नियम आहे. सकाळी आपल्या शरीराला चांगले वाटणे खूप महत्वाचे आहे, कारण आपल्याला दिवसभर काम करायचे असते. त्यासाठी मेंदू सक्रिय असणे आवश्यक आहे. भुकेल्यामुळे बरेच दुष्परिणाम होऊ शकतात. जर आपण रात्री झोपायच्या आधी भुकेले राहण्याचा निर्णय घेत असू आणि ऊर्जेची कमतरता आणि अस्वस्थतेच्या अभावाने आपल्याला झोप आली नाही,तर दुसऱ्या दिवशी काम करताना ते शरीराला हानिकारक ठरू शकते.
झोपेवर परिणाम
बर्याच लोकांनी उपाशी पोटी झोपताना अनुभव घेतला असेल की, त्यांचे पोट फुगले आहे. ज्यावेळी पोटात जेवण नसते, त्यामुळे पोटात भूक निर्माण होऊन ऊर्जा निर्माण होत असते. त्यामुळे झोपायला बराच वेळ लागतो. काहीवेळा रात्री भूक लागते. मात्र त्यावेळी खायला उठला तर झोपेवर परिणाम होतो, म्हणून जर तुम्हाला चांगले झोपायचे असेल तर, उपाशी राहू नका.
राग आणि चिडचिड
उपाशी पोटी झोपल्याने आपल्या मूडमध्ये परिणाम झाल्याचे दिसते. सतत राग आणि चिडचिडेपणा दिसून येतो. शुल्लक गोष्टींवर राग येतो. रात्रीचे जेवण न केल्यास मोठ्या प्रमाणात मूड स्विंग्स होण्याची शक्यता असते.
मसल्सवर परिणाम
जे लोक बॉडी किंवा मसल्स बनवण्याचा प्रयत्न करीत आहेत त्यांच्यासाठी उपासमार करणे हा एक वाईट पर्याय आहे. आपण डिनर वगळू शकता, परंतु प्रथिने स्नायूमध्ये रुपांतरित करण्यासाठी आपल्याला पोषक आहार आवश्यक आहे. रात्री उशीरा जेवणे चुकीचे आहे. मात्र आपल्या शरीरावर ताण पडू नये यासाठी वेळेत आहार घेणे गरजेचे आहे.