अभ्यास करताना झोप येते? मग वापरा 'या' टिप्स 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 21 February 2020

अभ्यास करताना अचानक डोळे मिटाय लागतात आणि विद्यार्थी झोपी जातो, अशा अनेक विद्यार्थ्यांच्या समस्या आहेत. काही सामान्य टिप्स वापरून झोपी पासून मुक्ती मिळविता येते.  

सध्या एसएससी (SSC), एचएससी(HSC), सीबीएसई(CBSE) बोर्डाच्या परीक्षा सुरु आहेत. विद्यार्थ्यांच्या करीअरचा सर्वांत महत्त्वाचा टर्निग पॉइंट म्हणून बोर्डाच्या परीक्षेकडे पाहीले जाते. परीक्षेच्या कालावधित खुप अभ्यास करुन मार्क मिळविण्यासाठी विद्यार्थी धडपडत असतात मात्र, अभ्यास करताना अचानक डोळे मिटाय लागतात आणि विद्यार्थी झोपी जातो, अशा अनेक विद्यार्थ्यांच्या समस्या आहेत. काही सामान्य टिप्स वापरून झोपीपासून मुक्ती मिळविता येते.  

सहा ते सात झोप

परीक्षेचा ताण असल्यामुळे विद्यार्थी पुर्ण झोप घेत नाहीत त्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यास करताना झोप येते. त्याचबरोबर विद्यार्थ्यांचे मानसिक संतूलन बिघडते. विद्यार्थ्यांनी सहा ते सात पुर्ण झोप घ्यावी. 

फळे करा सेवन

जड अन्न पोट भरुन जेवण केल्यामुळे विद्यार्थ्यांना सुस्ती येते आणि झोप लागते. झोपीला दूर करण्यासाठी पोषक आणि फायबरयुक्त अन्न खावे जसे सुप, सालाड आणि फळे त्यामुळे झोप लागत नाही. 

पाणी पळवणार झोप
शरीरात पाण्याची कमतरता असल्यामुळे झोप लागते. विद्यार्थ्यांनी अभ्यास करते वेळी पाणी घेऊन बसावे. तहान लागली की पाणी प्यावे. त्यामुळे विद्यार्थ्यांची झोप निघून जाईल.

अभ्यासात ब्रेक

काही विद्यार्थी सतत 4 ते 5 तास अभ्यास करतात. त्यामुळे डोळ्यावर अंधार येतो आणि झोप लागते. जास्तीजास्त दोन तास अभ्यास केला पाहीजे त्यानंतर ब्रेक घेऊन थोडावेळ फिरले आहे.  

विषय बदलून अभ्यास करा

एकच विषय किंवा एकच धडा सतत वाचन केल्यामुळे झोप येवु शकते. त्यामुळे विषय आणि धडा बदलून अभ्यास करावा. अभ्यास करताना झोप येणार नाही. 

आरामदाई ठिकाणी अभ्यास नको

आरामदाई ठिकाणी बसल्यामुळे झोप येवु शकते त्यामुळे विद्यार्थ्यांनी झोपीच्या जागी बसून अभ्यास करु नयेत. सुर्चीवर बसून आणि समोर टेबल ठेऊन अभ्यास केल्यामुळे झोप लागणार नाही.  

अभ्यास करताना विद्यार्थ्यांनी जोरजोरात वाचावे तसेच लिहलेले पुन्हा वाचावे केल्यामुळे विद्यार्थ्यांचे रिवीजन होते आणि जे अभ्यास केला तो लक्षात राहतो. अभ्यास करताना झोप लागत असेल तर थंड पाण्यानी तोंड धुवावे. विद्यार्थ्यांना आडणारी गोष्ट करावी. उदा. गाणे ऐकणे, चॉकलेट खाणे आदी. अभ्यास करताना विद्यार्थ्यांनी या टिप्स पाळल्यातर नक्कीच उपयोग होईल.   
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News