निवांत झोपा कारण पाक हवाई दल जागे; अन् भारताने उडवली झोप

यीनबझ ऑनलाईन टिम
Tuesday, 26 February 2019

नवी दिल्लीः भारताने केलेल्या एअरस्ट्राईकच्या तीन तास आधी पाकिस्तान डिफेन्स नावाच्या ट्विटर हॅण्डलवरुन ‘निवांत झोपा कारण पाकिस्तानी हवाई दल जागे आहे.’, असे ट्विट करण्यात आले होते. या ट्विटर हॅण्डलच्या विश्वासार्हतेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असले तरी या हॅण्डलच्या बायोमध्ये डिफेन्स डॉट पिओके या वेबसाईटचा उल्लेख करण्यात आला आहे. या ट्विटमध्ये पुढे पाकिस्तान जिंदाबाद हा हॅशटॅगही वापरण्यात आला.

रात्री 12 वाजून 6 मिनिटांनी हे ट्विट करण्यात आल्यानंतर अवघ्या साडेतीन तासात भारतीय हवाई दलाने पाकिस्तानवर हवाई हल्ला केला. त्यामुळे आता या ट्विटवरुन पाकिस्तानी हवाई दलाला तसेच पाकिस्तानलाही ट्रोल केले जात आहे....

भारताच्या लढाऊ विमानांनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषा (एलओसी) ओलांडून पाकिस्तान हद्दीत मोठी कारवाई केली. भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी पाकिस्तानच्या हद्दीत घुसून बालाकोट येथे बॉम्ब टाकला. आज पहाटे साडे तीनच्या ही कारवाई करण्यात आली.  यामध्ये जवळजवळ 300 दहशतवादी ठार झाले. देशभरात या कारवाईबद्दल भारतीय हवाई दलाचे अभिवनंदन करण्यात येत आहे. सोसल मिडियावरही अनेक मेसेज शेअर होत आहेत. तर या हल्ल्यानंतर पाकिस्तानमधील एक ट्विटर हॅण्डल चांगलेच चर्चेत आले आहे. हे ट्विटर हॅण्डल अधिकृत नसले तरी त्यांनी केलेले ट्विट सध्या चांगलेच चर्चेत आले आहे.

एअर स्ट्राईकचा वायरल झाला व्हिडीओ पाहा.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News