या कंपनीत दररोज ९ तास झोपा आणि कमवा एक लाख रुपये !

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 2 September 2020

या कंपनीत दररोज ९ तास झोपा आणि कमवा एक लाख रुपये !

या कंपनीत दररोज ९ तास झोपा आणि कमवा एक लाख रुपये !

प्रत्येकाला कंपनीत अनेक वर्षे काम केल्याने कंटाळा येतो, कधी एकदा सुटका होते, अशी अनेकांची मानसिकता तयार झालेली असते. अशा लोकांना आरामाची नोकरी कधी लागेल असाही विचार असतो. अशा लोकांसाठी ऑफिसमध्ये झोपा काढून पैसे कमावण्याची संधी देशातील एक कंपनी देत आहेत. झोपाळू लोकांसाठी ही सुवर्णसंधी असल्याचे म्हटले आहे. विशेष म्हणजे कामाऐवजी तिथं जाऊन ९ तास झोप काढायचे १ लाख रूपये मिळणार आहेत.

भारतातील एका कंपनीने स्लीप इंटर्नशीप सुरू केली आहे, ही कंपनी तुम्हाला कामासाठी नव्हे झोपण्साठी एवढे पैसे देणार आहे. बंगळूरूतील वेकफिट या गादी बनविणा-या कंपनीने  स्लीप इंटर्नशीप सुरू केली आहे. तिथं गेल्यांनतर तुम्हाला साधारण ९ तास झोपावं लागणार आहे. हे जर तुम्ही सलग १०० दिवस केल्यानंतर कंपनी तुम्हाला एक लाख रूपये देणार आहे. तुम्ही कसे झोपता याकडे सुध्दा बारकाईने लक्ष देण्यात येणार आहे.

इथे प्रवेशासाठी तुमच्याकडे कोणतीही पदवी असण आवश्यक आहे. गेल्यावर्षी सुध्दा या कंपनीने स्लीप इंटर्नशीप सुरू केली होती. त्यावेळी १.७ लाख लोकांनी स्लीप इंटर्नशीपसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी २३ जणांची कंपनीने निवड केली होती. पुन्हा या कंपनीने  स्लीप इंटर्नशीप वेबसाईटवरती अर्ज स्विकारण्यास सुरूवात केली आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News