कुशल अकुशल कामगारांना येथे मिळेल नोकरी; १६ हजार ७२६ जागांसाठी निघाली भरती

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Sunday, 19 July 2020

निघाली. राज्यातील कुशल अकुशल कामगारांना नोकरीची संधी मिळणार आहे. त्याचबरोबर रहण्याचाी सोय, दोन वेळचे जेवन, वैद्यकीय सेवा, बीमा संरक्षण आणि राहण्याच्या ठिकाणापासून कामापर्यंतच्या प्रवासाची मोफत सोय केली जाणार आहे. 

मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा अंतर्गत विविध कामांसाठी मनुष्यबळाची आवश्यकता आहे. त्यासाठी १६ हजार पेक्षा अधिक जागांची नोकर भरती निघाली. राज्यातील कुशल अकुशल कामगारांना नोकरीची संधी मिळणार आहे. त्याचबरोबर रहण्याचाी सोय, दोन वेळचे जेवन, वैद्यकीय सेवा, बीमा संरक्षण आणि राहण्याच्या ठिकाणापासून कामापर्यंतच्या प्रवासाची मोफत सोय केली जाणार आहे. 

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन सुरु करण्यात आले. लॉकडाऊनमुळे उद्योग, व्यावसाय, विविध कामे बंद पडले. त्यामुळे लाखो कामगारांवर बेरोजगारीची वेळ आली. पोटाची खळजी भरण्यासाठी राज्यात आलेले परप्रांतीय कामगार स्वगृही निघून गेले. त्यामुळे अनेक क्षेत्रात कामगारांची आवश्यकता भासू लागली. ही आश्यकता भरुन काढण्यासाठी स्थानिक कामगारांना प्राधान्य देण्यात आले. त्यामुळे राज्यातील लाखो कामगारांना नोकरीची संधी उपलब्ध झाली.    

अकुशल कामगारांना प्रशिक्षण

अकुशल कामगारांना एक महिन्याचे मोफत प्रशिक्षण देऊन यशस्वीरित्या प्रशिक्षण पुर्ण करणाऱ्या उमेदवारांना नोकरी दिली जाणार आहे. प्रशिक्षण कालावधीत उमेदवारांना उदर्निवाहासाठी मानधन देण्याची सोय करण्यात आली. त्यासाठी इच्छूक उमेदवारांनी खालील दिलेल्या नंबरवर संपर्क करावा असे आवाहन मुंमप्रविप्रा कडून करण्यात आले.    

पदाचे नाव आणि तपशील :  

अनु. क्र    पदांचे नाव                      पदे

१.              गवंडी                           २७७                     
२.         सुतार काम                        २६७८
३.          फिटर (स्टिल)                   २६६
४.          फिटर (बार बेडिंग)            ३३५९
५.            वेल्डर                            ४२३
६.       अकुशल कामगार                 ७४५९
७.      इलेक्ट्रिशन, वायरमन             २१६७
          एकुण जागा                         १६७२६             

इच्छूक उमेदवारांनी  ०२२-२६५९१२४१, २६५९४१७६ आणि ८६५७४०२०९० या क्रमांकावर संपर्क करावा.

अधिक माहितीसाठी: https://drive.google.com/file/d/1c9W86uC-Zf_srEaKmdzou_9Bvi6GMe_p/view

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News