टाळेबंदीनंतर नोकरी मिळवण्यासाठी 'ही' कौशल्य आवश्यक; असे करा विकसित

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 1 June 2020

टाळेबंदीनंतर उद्योग, व्यवसाय हळूहळू पुर्व पदावर येतील. लाखो तरुणांना नोकऱ्या मिळतील, मात्र नोकरी मिळवण्यासाठी काही कौशल्य आवश्यक असतात. ती कौशल्य कशी विकसीत करावी याविषयी आम्ही सांगणार आहेत.  

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने देशात टाळेबंदी जाहीर केली. टाळेबंदीमुळे देशातील उद्योग, व्यवसाय बंद झाले. त्यामुळे करोडो कामगारांवर उपासमारीची वेळ आली. लाखो तरुणांच्या नोकऱ्या गेल्या. टाळेबंदीनंतर उद्योग, व्यवसाय हळूहळू पुर्व पदावर येतील. लाखो तरुणांना नोकऱ्या मिळतील, मात्र नोकरी मिळवण्यासाठी काही कौशल्य आवश्यक असतात. ती कौशल्य कशी विकसीत करावी याविषयी आम्ही सांगणार आहेत.  

क्षेत्र निवड

विविध क्षेत्रात कमी- अधीक प्रमाणात नोकऱ्या उपलब्ध आहेत. मात्र, कोणत्या क्षेत्रात अधिक नोकऱ्या उपलब्ध आहेत याची माहिती उमेदवारांनी घ्यावी. सध्या ऑनलाईन शिक्षण, आरोग्य, सेवा क्षेत्रात नोकरी मोठ्या प्रमाणात संधी आहे. या क्षेत्रासंबंधीत 8 दिवसापासून ते 1 वर्षापर्यतचे स्किल कोर्स उपलब्ध आहोत. हे स्किल कोर्स तरुणाईला नोकरी उपलब्ध करुन देऊ शकतात.  

जनसंपर्क 

नोकरी मिळवण्यासाठी कमी वेळात जनसंपर्क वाढवणे महत्त्वाचे आहे. जनसंर्कामुळे कमी काळात नोकरी मिळू शकते. त्यामुळे विविध कंपणीच्या व्यवस्थापक आणि बॉस सोबत संपर्क वाढवा. नोकरीच्या शोधात असल्याची माहिती व्यवस्थापकांना द्यावी. कंपणीत जागा उपलब्ध झाल्यानंतर व्यवस्थापन उमेदवारांना संपर्क करेल.  आणि भविष्यात जनसंपर्क उपयोगी येईल. नोकरी डॉट कॉम, मास्टर डॉट कॉम, जॉब डॉट कॉम, शाईन डॉट कॉम अशा संकेतस्थवार नोकरीसाठी प्रोफाईल तयार करावी. त्यामुळे नोकरीची थेट माहिती उमेदवरांपर्यंत पोहोचेल. 

असे करा रिझ्यूम आणि कव्हर लेटर तयार  

सध्या नोकरीच्या संधी कमी आणि बेरोजगारी जास्त आहे. त्यामुळे नोकरीसाठी प्रचंड स्पर्धा सुरु आहे. नोकरी मिळवण्यासाठी आकर्षक रिझ्यूम आणि कव्हर लेटर आवश्यक आहे. रिझ्युमध्ये स्किल विषयी माहिती लिहावी. निवडकर्ता सर्वप्रथम रिझ्यूम पाहतो, त्यांना आवश्यक आसणारी कौशल्य रिझ्यूमध्ये दिसल्यामुळे उमेदवारांनी निवड करण्यास सोपी जाते. त्यामुळे कौशल्यावर अधिक भर द्यावा. 

तात्काळ करा अर्ज- 

कपन्यांना अनेकवेळा तात्काळ कर्मचाऱ्यांची आवश्यकता असते, त्यामुळे नोकरीची जाहीरात निघाली की, तात्काळ अर्ज करावा. शेवटच्या तारखेची वाट पाहू नये. अनेकजन जाहीरातीच्या शेवच्या तारखेची वाट पाहतात आणि उशीरा अर्ज करतात. त्यामुळे आपल्यापेक्षा लवकर अर्ज करणारा उमेदवार निवडण्याची शक्यता असते. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News