सहा वर्षांनंतर सोलापुरात दिसला निळ्या डोक्याचा कस्तूर
सोलापूर - तब्बल सहा वर्षांनंतर सोलापुरात बाळे परिसरात निळ्या डोक्याचा कस्तूर हा पक्षी दिसून आला आहे.
ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी साजऱ्या केल्या जाणाऱ्या जागतिक पक्षी स्थलांतर दिवशी निळ्या डोक्याचा कस्तूर दिसल्याने आनंद व्यक्त होत आहे. शनिवारी सकाळी नेचर कॉंझर्वेशन सर्कलचे सदस्य सुरेश क्षीरसागर हे बाळे परिसरात फेरफटका घालत होते. त्यांना एक वेगळाच पक्षी दिसला.

त्यांनी त्या पक्ष्याचे फोटो मोबाईलमध्ये काढून पक्षी अभ्यासक भरत छेडा यांना व्हॉट्सऍपद्वारे पाठविले. तो पक्षी निळ्या डोक्याचा कस्तूर असून तो दुर्मिळ असल्याचे श्री. छेडा यांनी कळविले.
निळ्या डोक्याच्या कस्तूर हा पक्षी सहा वर्षांपूर्वी डॉ. अविनाश राऊत यांनी पाहिला होता. त्यांनी आपल्या कॅमेऱ्यात फोटोही काढले होते. तब्बल सहा वर्षांनी या पक्ष्याचे दर्शन सोलापुरात झाले आहे. संतोष धाकपाडे यांनी आपल्या कॅमेऱ्यात या पक्ष्याचे फोटो टिपले आहेत.
सकाळी, सायंकाळी गातात पक्षी...
मसिकॅपिडी पक्षिकुलाच्या टर्डिनी उपकुलातील पक्ष्यांना सामान्यत: कस्तूर म्हणतात. हे पक्षी जगभर आढळत असले तरी युरोप व आशियाच्या समशितोष्ण व उपोष्ण प्रदेशात ते प्रामुख्याने आढळतात. भारतातही सर्व ठिकाणी हे पक्षी दिसून येतात. काही जाती उत्तर अमेरिकेत राहतात. या पक्ष्यांचे प्रमुख खाद्य फळे, कीटक, कृमी आणि गोगलगाय आहे. हे गाणारे पक्षी असून सकाळ, सायंकाळी गातात. घरटे बांधणे व अंडी उबविणे ही कामे मादी करते. नर व मादी दोघेही पिल्लांना भरवितात. घरटे वाटीसारखे किंवा सपाट असून चिखलात मुळ्या, शेवाळ, गवत वगैरे मिसळून त्यांचे बनविलेले असते.