महाराष्ट्रातील या जिल्ह्याचे २१ जण इराणमध्ये अडकले

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 29 February 2020

इराकने प्रवेश बंदी केल्याने हे सर्व पर्यटक तेहरान येथे अडकून पडले. आठ दिवस ते याच ठिकाणी फिरत राहिले.

कोल्हापूर : कोल्हापूर, सांगली, अकलूज येथून इराक सहलीवर गेलेले ४४ पर्यटक कोरोना व्हायरसच्या कारणाने इराणमधील तेहरानमध्ये अडकले आहेत. शुक्रवारी सकाळी सहा वाजता सर्व पर्यटक तेहरान येथून निघून मुंबई दुपारी साडेबाराला पोहोचणार होते; मात्र भारताने इराण येथून येणाऱ्या विमानांना परवानगी नाकारल्याने सर्व प्रवासी अडकून पडले आहेत.

यात कोल्हापूरचे २१ तर उर्वरित प्रवासी सांगली आणि अकलूज येथील असल्याचे समजते. मुंबई येथील साद टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनीने इराक सहलीचे आयोजन केले होते. मुंबई येथून २१ तारखेला पर्यटक मुंबई ते तेहरान आणि तेहरान ते नजम (इराक) या विमानाने गेले होते. मात्र इराकने प्रवेश बंदी केल्याने हे सर्व पर्यटक तेहरान येथे अडकून पडले. आठ दिवस ते याच ठिकाणी फिरत राहिले.

शुक्रवारी सकाळी सहा वाजता भारतात येणारे विमान आल्याने या पर्यटकांनी रात्री बारा वाजता हॉटेल सोडले; मात्र विमानतळावरुन सहा वाजताची विमान भारताकडे निघालेच नाही. त्यामुळे सर्व पर्यटक तेथेच अडकून पडले आहेत. ज्या हॉटेलमध्ये ते राहिले होते, त्यांनी पुन्हा या पर्यटकांना राहण्यास 
नकार दिला. त्यामुळे या पर्यटकांना तेहरिनच्या आजूबाजूला फिरण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News