खारघरमध्ये शिवसैनिकांचा शेलारविरोधी निषेध.... 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 4 February 2020

भाजपचे माजी नेते आशिष शेलार यांनी मुखमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या वादग्रस्त विधानामुळे राजकीय वर्तुळाबरोबर कार्यकर्यांमध्येहि चांगलेच वातावरण तापले आहे.

नवी मुंबई : शिवसेनेच्या मुखपत्रातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेण्यात आली होती. यामध्ये उद्धव ठाकरेंनी ' महाराष्ट्रात एनआरसी कायदा लागू देणार नाही' असे म्हटले होते.  नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला विरोध नाही पण तो महाराष्ट्रात नको अशी उद्धव ठाकरेंची भावना मुलाखतीतून समोर आली होती.  यावर भाजपचे नेते आशिष शेलार यांनी 'नागरिकत्व संशोधन कायदा (सीएए) लागू न करायला मुख्यमंत्र्यांच्या बापाचं राज्य आहे का?' असा टोला लगावला होता. शेलारांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळ चांगलंच तापलं होतं. आता याचे पडसाद कार्यकर्त्यांमध्ये देखील उमटायला लागले आहेत.  

आज (दि. ४) खारघर मध्ये आशिष शेलार यांच्याविरोधात शिवसैनिकांनी आपला राग व्यक्त करत निषेध नोंदवला आहे. खारघरमधील युवा शिवसैनिकांनी आशिष शेलार यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला आहे. आपला राग व्यक्त करत 'अश्या मनोरुग्ण प्रवुत्तीचा धिक्कार आहे', असं म्हणत युवा शिवसैनिकांनी आशिष शेलार यांच्याविरोधात घोषणा दिल्या. यावेळी युवासेना राष्ट्रीय सहसचिव श्री.रुपेशदादा पाटील, शिवसेना रायगड जिल्हा उप संघटक श्री,परेश भाई पाटील , उपमहानगर संघटक श्री.गुरुनाथदादा पाटील , राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष श्री.सतीश पाटील , पनवेल तालुका अध्यक्ष अवजड वाहतूक सेना श्री.रोशन पवार , शाखा प्रमुख सचिन ठाकूर , राहूल गायकवाड ,  गुप्ताजी ,नागोटकर , आणि मोठ्या संख्येने युवासैनिक शिवसैनिक उपस्थित होते. 

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News