खंबीर आई, लाचार मुलं व्हाया विश्वास नांगरे-पाटील

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 2 April 2019

नाशिक - माणूस बदलतो हे सर्वांना माहित आहे, पण रक्ताचा पोरगा जर आईच्या जीवावर उठत असेल, तर त्याच्यापेक्षा दुर्दव्यी गोष्ट कोणतीच त्यांच्या आई-वडिलांसाठी नसेल. असाच एक धक्कादायक प्रकार काही दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्रभरातील जनतेने पाहिला. एक व्हीडीओ असा जो हृदय हेलावून टाकेल. एका मातेने काकूळतेने स्वत:ची व्यथा त्या व्हिडीओतून सांगण्याचा प्रयत्न केला होता.

त्या व्हिडीओची दखल तरुणांचे आयडॉल मानल्या जाणाऱ्या नाशिकचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी घेतली आणि त्यांनी त्या माऊलीला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. दोन उच्च पदावर असलेली तरणीबांड मुलं. एक मुलगा फौजदार आणि दुसरा कंडक्टर, दोघांनाही चांगला पगार. पण आईला सांभाळायची अक्कल नव्हती, हे त्यांचे दुर्भाग्य.

त्या व्हीडीओमधल्या भीक मागणाऱ्या 61 वर्षीय मातेचे नाव होते, प्रमिला पवार. 1965 मध्ये प्रमिला यांचे पती नाना पवार यांचे शिपाई पदावर असताना निधन झाले, ज्यावेळी त्यांची दोन मुले 15 आणि 14 वर्षाची होती आणि तेव्हापासून त्यांचा दुर्दवी संसाराचा प्रपंच सुरू झाला. म्हणजे मुलांना सांभाळायच्या वयात आईने आपलं कर्तव्य बजावलं, पण ज्यावेळी मुलावर जबाबदाऱ्या येतात, त्यावेळी मात्र त्यांनी जबाबदाऱ्या फेटाळल्या.

अखेर खंभीर मनाच्या आणि आदर्श मानल्या जाणाऱ्या विश्वास नांगरे पाटील यांनी त्यांच्या कुटुंबियांना शोधण्याची जबाबदारी स्विकारली आणि त्या मातेला आपल्या मुलांपर्यंत नेऊन पोहचवले. ती माता होती नंदुरबार जिल्हातली, मात्र तिच्या दोन मुलांचे लग्न झाल्यानंतर ते नाशिक येथे राहू लागले. सुना सांभाळत नाहीत आणि मुलांना वेडी होती म्हणून घराबाहेर काढलं होती.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News