काय दिलं बहीण अर्पिताने सलमानला 'बर्थडे गिफ्ट'!

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 28 December 2019

अर्पिताला आज सकाळी 8 वाजता हिंदुजा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. यावेळी अर्पिताचा पती आयुष आणि कुटुंबातील सर्व प्रमुख मंडळी त्याठिकाणी हजर होते. मुलगी झाल्यानंतर आयुष आणि अर्पिताने सर्व चाहते आणि प्रसार माध्यमांचे आभार मानले.

सलमानचा वाढदिवस काल रात्री घरगुती पद्धतीने साजरा केल्यानंतर अर्पिताला आज सकाळी 8 वाजता हिंदुजा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. 'दबंग खान', 'भाईजान' अशी बिरुदं मिरवणाऱ्या सलमान खानचा आज 54 वाढदिवस. हा वाढदिवस त्याचे चाहते मोठ्या उत्साहात साजरे करत आहेत.

मात्र, आता सलमान आणि त्याच्या कुटुंबियांनी चाहत्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी दिली आहे. याचे खास कारण म्हणजे, सलमानची बहिण अर्पिताला कन्यारत्न झाले आहे. अर्पिता दुसऱ्यांदा आई झाली आहे. अर्पिता आणि तिचा पती आयुष शर्मा यांना अहिल नावाचा एक मुलगा आहे. अर्पिताला झालेल्या कन्यारत्नाचं नाव आयत असं ठेवण्यात आलं आहे. 

अर्पिताने तिच्या भाईजानला वाढदिवसाच्या दिवशी हे खास गिफ्ट दिल्याने वाढदिवसाचा माहोलच पूर्ण बदलला आहे. या बाळाच्या येण्यामुळे पूर्ण खान आणि शर्मा कुटुंब आनंदाने न्हाऊन निघालेलं पाहायला मिळालं. सलमानचा वाढदिवस काल रात्री घरगुती पद्धतीने साजरा केल्यानंतर अर्पिताला आज सकाळी 8 वाजता हिंदुजा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं.

यावेळी अर्पिताचा पती आयुष आणि कुटुंबातील सर्व प्रमुख मंडळी त्याठिकाणी हजर होते. मुलगी झाल्यानंतर आयुष आणि अर्पिताने सर्व चाहते आणि प्रसार माध्यमांचे आभार मानले. तुम्ही दिलेल्या प्रेमाबद्दल आम्ही आभारी आहोत, असं त्यांनी म्हटलं आहे. 

दरम्यान, अर्पिता प्रेग्नंट असल्यामुळे भाईजान सलमान खानने त्याचा वाढदिवस पनवेल येथील फार्महाऊसवर साजरा न करता त्याचा भाऊ सोहेलच्या वांद्रे येथील घरी साजरा करण्याचे ठरवले होते. त्यानुसार त्याने आपला वाढदिवस कुटुंबियांसोबतच साजरा केला.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News