भारतीय क्रिकेट संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर होता. या दौऱ्यादरम्यान दक्षिण ऑस्ट्रेलिया क्रिकेट असोसिएशनने खेळाडूंसाठी डिनर पार्टी आयोजित केली होती. संपूर्ण टीम पार्टीला दिलेल्या वेळेत पोहोचली. पार्टीला उपस्थित सगळ्यांनी आपापल्या जागा घेतल्या. १९७७-७८ संघाचा युवा फलंदाज आणि उपकर्णधार सुनील गावस्कर यांनीही आपली जागा पाहून बसून घेतले.
गावस्कर आपल्या आसनावरती शांत बसले होते आणि त्यांनी सर डॉनचे काय सांगत आहेत काळजीपूर्वक ऐकत होते. सर डॉन यांनी १९४७-४८ च्या भारतीय क्रिकेट संघाबद्दल सांगत होते की, त्यावेळी विजय मर्चंट आणि रूसी मोदींशी कशा पध्दतीनं बोलणं व्हायचं. सुरू असलेल्या संभाषणादरम्यान सर डॉन यांनीही एका घटनेबद्दल खेद व्यक्त केला होता.
जहाज बराचवेळ बॉम्बे डॉकमध्ये उभं राहिलं. पण सर डॉन एवढ्या वेळ आपल्या केबिनमधून बाहेर पडले नाहीत. कारण, त्यांची तब्येत फारशी चांगली नव्हती आणि त्यांना कोणत्याही संसर्गाचा धोका पत्करायचा नव्हता. म्हणूनच ते त्याच्या केबिनमध्ये राहिले. तसेच सुरू असलेल्या चर्चेत सर डॉन यांनी गावस्कर यांना भारत आणि शिवसेना यांच्याबद्दल अनेक प्रश्न विचारले. या संपूर्ण चर्चेदरम्यान आणि डिनर पार्टीदरम्यान गावस्कर खूप जोरात हसत राहिले, पण ते त्यांच्या जागेवरून हलले नाहीत.
गावस्करांना सर डॉनबरोबर एकही क्षण चुकवायचा नव्हता. आता गावस्कर असे का करत होते ? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. खरं तर दौऱ्यावर जाण्यापूर्वी मुंबईचे प्रसिद्ध प्रशिक्षक वासू परांजपे यांनी गावस्करांना सर डॉनबरोबर जास्तीत जास्त वेळ घालवावा असं सांगितलं होतं. त्यामुळे त्यांच्याशी झालेल्या संपूर्ण भाषणाची नोंद गावस्करांना वासू परांजपे यांना द्यायची होती.
वासू परांजपे हे मुंबईच्या मोजक्या दिग्गज प्रशिक्षकांपैकी एक होते. वासू सर डॉन ब्रॅडमन यांना देव मानायचे आणि गावस्करांसाठी वासूची प्रतिष्ठा अत्यंत उच्च होती. ऑस्ट्रेलियन क्रिकेटचा जब्रा चाहता वासू सुनिल गावस्करचा सुरुवातीचा प्रशिक्षक होता आणि त्याने सुनीलला 'सनी' हे टोपणनाव दिलं होतं, जे आज गावस्करांची ओळख बनली आहे.
"१९४८ च्या दौ-यासाठी आम्ही इंग्लंडला निघालो होतो. तेव्हा आमचं जहाज मुंबईत काठावर आलं होतं. मला भेटायला हजारो लोक तिथे जमले होते. मी डेकवर जाऊन त्याच्या शुभेच्छाही स्वीकारू शकलो नाही. त्याबद्दल मला नेहमीच पश्चात्ताप वाटायचा. विजय मर्चेंट जहाजावर आला आणि मला भेटला. त्याने मला डेकवर येऊन चाहत्यांच्या दिशेने हात हलवायला सांगितला, पण मी त्याची विनंती पूर्ण करू शकलो नाही," - सर डॉन ब्रैडमैन