'ही' गायिका प्रसिद्धी झोतात  

यिनबझ ऑनलाईन टीम
Thursday, 21 February 2019

गायिका सुनंदा शर्माचे २०१६ मध्ये ‘बिल्ली अख’ गाणे प्रदर्शित झाले आणि या गाण्यापासूनच तिच्या करिअरला सुरुवात झाली. सुनंदाच्या या गाण्याने तरुणाईच्या मनावर राज्य केले. त्यानंतर ‘पटाके’, ‘जानी तेरा ना’ ही तिची गाणी तर तरुणाईला फारच भावली.

सुनंदा इथवरच थांबली नाही तर तिने बॉलीवूडपर्यंत मजल मारली. गेल्या वर्षी रॅपर बादशाहबरोबर ‘तेरे नाल नचना’ हे गाणे तिने गायले. तिच्या या गाण्याला युट्यूबवर १६० मिलियनपेक्षा अधिक व्ह्युज मिळाले.

आता पुन्हा एकदा सुनंदाच्या आवाजातील गाणे प्रेक्षकांना थिरकायला लावणार आहे. कार्तिक आर्यन आणि क्रिती सनॉन स्टारर ‘लुकाछुपी’ चित्रपटातील ‘पोस्टर लगवा दो’ हे गाणे सुनंदाने गायले आहे. तिच्या या गाण्याला युट्यूबवर २२ मिलियनपेक्षा अधिक व्ह्युज मिळाले आहेत. शिवाय तिचे ‘सॅंडल’ हे गाणेही लवकरच प्रदर्शित होणार आहे.

अवघ्या तीन वर्षांतच सुनंदा प्रसिद्धीच्या झोतात आली आहे. सुनंदाची संगीत क्षेत्रातील ही वाढती प्रगती पाहता आपल्या यशाची गुरुकिल्ली ही आपल्याच हातात असते हे लक्षात येते.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News