सिक्कीमचा 'जलोट पास'ची ही काही खाय वैशिष्ट्ये

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 29 August 2019
  • वेत गारवा जाणवायला लागलेला. एका ठिकाणी थांबून आम्ही गरम कपडे भाडयाने घेतले. 
  • दुपारच्या जेवणासाठी सांगितलं. हातमोजे, गंबूट, जॅकेट असा जामनिमा करुन आम्ही निघालो. 

सिक्कीमला आम्हाला जलोट पासला जायचं होतं त्यासाठी योग्य ती कागदपत्रं सादर केली आणि आम्हाला सैन्याकडून तिथे जायची परवानगी मिळाली. सकाळी सकाळीचं आम्ही जायला निघालो. हवेत गारवा जाणवायला लागलेला. एका ठिकाणी थांबून आम्ही गरम कपडे भाडयाने घेतले. तिथेचं दुपारच्या जेवणासाठी सांगितलं. हातमोजे, गंबूट, जॅकेट असा जामनिमा करुन आम्ही निघालो. 

आजूबाजूला छोटी छोटी घरं आणि बारिक डोळयांची माणसं दिसत होती. सगळयांनी कोट घातलेले. थंडीचं ईतकी प्रचंड होती नं. रस्त्यामध्ये एक कुत्रा दिसला. त्याच्या अंगावरही फर होती. चेकपोस्टवर त्यांनी आमचे कागदपत्र तपासले. आता आम्ही सैन्याच्या हद्दीत प्रवेश केला होता.

ठिकठिकाणी सैनिक, त्यांचे ट्रक आणि ईतर वाहनं दिसायला लागली. निसर्गाचं देखण रुप पाहतं आम्ही पुढे जात होतो. डोंगर दर्‍या, नागमोडी वळणं आणि डोंगरावर पसरलेला शुभ्र बर्फ. आकाशात काळया ढगांची लगबग चाललेली त्यामुळे मध्येचं ऊन मध्येचं सावली असा खेळ चालू होता. मध्येचं धुकं लागायचं. खरं पाहता ते ढग होते कारण आम्ही खूपं उंचावर आलो होतो.

जाताना आम्हाला वाटेत बाबाजींचं नविन मंदिर पहायला मिळालं पण आम्हाला त्यांच्या मूळ मंदिरामध्ये जायचं होतं म्हणून आम्ही तिथे थांबलो नाही. आम्ही शेवटी बाबाजींच्या जुन्या मंदिरामध्ये पोहोचलो. लाल आणि पिवळया रंगाने सजलयं हे मंदिर. पायर्या चढताना जागोजागी घंटा बांधलेल्या. रेलिंगच्या बाजूला फुलझाडांच्या कुंड्या ठेवलेल्या.

हे मंदिर 13,123 फुट उंचावर आहे. खरं पाहता तो बंकर आहे ज्याला मंदिर बनवलेलं आहे. ईतक्या ऊंचावर ऑक्सिजन थोडा कमी असल्यामुळे तिथे आलेल्या काही लोकांना श्वास घ्यायला त्रास होत होता. वर जाताना बारिक बारिक पाऊस पडत होता. तिथे पोहोचल्यावर तर गारांचा पाऊस पडायला लागला.

आयुष्यात पहिल्यांदाचं गारा बघितल्यामुळे मी तर निरंजनच्या जोडीने हातावर गारा घेऊन ऊडवायचा खेळ खेळत होते. मंदिर परिसरामध्ये रेजिमेंटच्या वेगवेगळया विजयानिमित्त फरश्या बसवलेल्या होत्या एका फरशीवर बाबाजींबद्दल माहिती दिली होती. बाबाजींचं खरं नाव हरभजन सिंग होतं. ते पंजाब रेजिमेंटमध्ये होते. १९६८ मध्ये ते खेचरावरून नदी पार करत असताना नदीत वाहून गेले.

२ दिवस त्यांचा शोध घेतल्यावरही त्यांचं शव मिळालं नाही तेव्हा त्यांच्याबरोबरच्या सैनिकाच्या स्वप्नात जाऊन त्यांनी ती जागा सांगितली. सांगितलेल्या ठिकाणावर त्यांचं शव सापडलं. मग सगळया सैनिकांनी मिळून त्यांचे अंतिम संस्कार केले. त्यानंतर त्यांच्या बंकरला मंदिर बनवण्यात आलं. तिथे त्यांच्या वापरातल्या वस्तू ठेवलेल्या आहेत.

रोज त्यांचा बेड वगैरे व्यवस्थित साफ करुन ठेवलेला असतो. रोज त्यांच्या बूटाला चिखल लागलेला असतो आणि बेडवर चूण्या पडलेल्या असतात. अशा प्रकारे बाबांच्या वस्तू वापरल्याच्या खूणा मिळतात असं तिथले लोकं सांगत होते. तिथे बाबाजींची आरतीही वाचायला मिळाली. बंकरमध्ये वह्या ठेवलेल्या होत्या.

त्यात लोक त्यांच्या ईच्छा लिहितात त्या पूर्ण होतात अशी श्रध्दा आहे. तिथे पाण्याच्या बाटल्या तीन दिवस ठेवल्या आणि ते पाणी प्यायलं तर रोगापासुन मुक्ति मिळते असं म्हणतात.
 
तिथल्या लोकांचं म्हणणं आहे की गेली कित्येक वर्ष बाबा सिमेवर पहारा देत आहेत. भारत आणि चीनच्या फ्लॅग मिटींगमध्ये बाबांसाठी खुर्ची ठेवली जाते. बाबांना सैन्याकडून दरमहा पगार दिला जायचा. नियमानुसार त्याची बढती होत असे. त्यांना वर्षातून २ महिने सुट्टी मिळायची आणि त्यांना ३ सैनिकांबरोबर त्यांच्या गावाला पाठवायचे. त्यांची ट्रेनमध्ये सीट बूक केली जायची.

त्यांचं सामान गावाला पाठवलं जायचं. नंतर मात्र काही लोकांनी सैन्यामध्ये अंधविश्वासाला थारा देवू नये म्हणून न्यायालयाचे दार ठोठावले तेव्हापासून बाबांचं गावाला जाणं बंद झालं.आता बाबा रिटायर्ड झाले आहेत. त्यांची पेन्शन अजूनही त्यांच्या कुटूंबाकडे पोचती केली जाते.

ईथे रुजू झालेला प्रत्येक नविन सैनिक बाबाजींचे आशिर्वाद घ्यायला येतो. बाबाजींचं दर्शन घेवून आम्ही बाहेर पडलो आणि निघालो नथूला पासला. आपल्या भारतात किती वेगवेगळ्या प्रकारची स्थळे आहेत नं प्रत्येकाची खासियत वेगळीच...

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News