बॅचलर ऑफ आर्किटेक्चर प्रवेश पुर्व परीक्षेत महत्त्वाचा बदल; विद्यार्थ्यांना फटका बसण्याची शक्यता

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 8 August 2020

बारावी परीक्षेत सरासरी मार्कांची अट रद्द करण्यात आली. आणि ऑनलाईन परीक्षा घेण्याचा निर्णय जाहीर करण्यात.

मुंबई : आर्किटेक्चर पदवी पुर्व प्रवेश परीक्षेत यंदा महत्त्वाचा बदल करण्यात आला. बारावी परीक्षेत सरासरी मार्कांची अट रद्द करण्यात आली. आणि ऑनलाईन परीक्षा घेण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. त्यात बरोबर चित्रकेलेचे मार्क रद्द करण्यात आले, त्यामुळे लाखो विद्यार्थ्यांना या निर्णयाचा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.   

पुर्वी बॅचलर ऑफ आर्किटेक्चर पदवीला प्रेवश घेण्यासाठी नॅशनल अॅप्टीट्यूट टेस्ट फॉर आर्किटेक्चर (नाटा) प्रवेश परीक्षा द्यावी लागते. पुर्वी प्रवेश परीक्षेला अर्ज करण्यासाठी बारावीत कमीक कमी ५० टक्के मार्क आवश्यक होते, त्याच बरोबर भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि  गणित विषय घेऊन उत्तीर्ण होणे गरजेचे होते. मात्र, यंदा बारावी विज्ञान शाखेतून भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित विषय घेऊन फक्त पास होणे आवश्यक आहे. दहावी नंतर गणित विषय घेऊन पदविका पास विद्यार्थ्यांना नाटा परीक्षेसाठी अर्ज करता येणार आहे. 

नॅशनल अॅप्टीट्यूट टेस्ट फॉर आर्किटेक्चर महत्त्वाचे बदल  

आर्किटेक्चर पुर्व परीक्षा दोन भागात घेतली जाते. 'अ' आणि 'ब'. पहिला पेपर 'अ' २९ ऑगस्ट रोजी होणार आहे. मात्र दुसरा पेपर केव्हा घेतला जाईल हे निश्चित नाही. ही परीक्षा २०० मार्काची आहे. पुर्वी २०० पैकी १२५ मार्ग चित्रकलेला होते मात्र, ऑनलाईन परीक्षेत चित्र काढता येत नसल्यामुळे चित्रकलेचे १२५ मार्क रद्द करण्यात आले. चित्रकलेला अधिक मार्ग असल्यामुळे विद्यार्थी वर्षभर चित्रकलेची प्रॉक्टीस करतात. यंदा चित्रकला विषय परीक्षेतून वगळण्यात आला त्यामुळे विद्यार्थ्यांना नाटा परीक्षेत फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. परीक्षा ऑनलाईन  असल्यामुळे विद्यार्थ्यांना घरी बसून पेपर सोडवता येणार आहे. त्यामुळे पेपर सोडवतांना कॉपी करण्याची शक्यता आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News