उभं राहून जेवल्याने आपल्या शरीराचं किती नुकसान होतं? जाणून घ्या!

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Sunday, 15 September 2019

एक असा काळ होता जेव्हा लोक जमिनीवर बसून जेवायचे. बसून जेवल्याने आपलं मन शांत आणि एकाग्र राहतं. पण उभं राहून जेवल्याने ती एकाग्रता राहत नाही. पण काळानुसार सगळ्या गोष्टी जलद होऊ लागल्या तशी जेवणाची पद्धतही बदलत गेली टेबल-खुर्चीवर बसून जेवायला लागली असतानाच  उभं राहून जेवण करण्याची पद्धत सुरु झाली. 

एक असा काळ होता जेव्हा लोक जमिनीवर बसून जेवायचे. बसून जेवल्याने आपलं मन शांत आणि एकाग्र राहतं. पण उभं राहून जेवल्याने ती एकाग्रता राहत नाही. पण काळानुसार सगळ्या गोष्टी जलद होऊ लागल्या तशी जेवणाची पद्धतही बदलत गेली टेबल-खुर्चीवर बसून जेवायला लागली असतानाच  उभं राहून जेवण करण्याची पद्धत सुरु झाली. 

लग्न कार्य असो किंवा एखादी पार्टी प्रत्येक ठिकाणी तुम्हाला बुफे डिनर किंवा बुफे लंच पाहायला मिळेल. फार कमी ठिकाणी बैठक लावून जेवण दिलं जातं.

उभं राहून जेवल्याने आपल्या शरीराचं किती नुकसान होतं याबद्दल अनेकजण अनभिज्ञ असतात. आज आम्ही तुम्हाला उभं राहून जेवल्याने होणाऱ्या नुकसानाबद्दल सांगणार आहोत.

उभं राहून जेवल्याने अपचन, लठ्ठपणा असे आजार उद्भवतात. असं म्हटलं जातं की उभं राहून खाल्ल्याने आपल्या शरीरातील आतड्या आकसल्या जातात आणि त्यामुळे खाल्लेलं पचायला त्रास होतो.

उभं राहून जेवताना आपल्या पायात बूट किंवा चप्पल असते ज्यामुळे आपले पाय गरम पडतात. आयुर्वेदानुसार जेव्हा आपण जेवतो तेव्हा आपले पाय थंड असणं महत्त्वाचं आहे.

बुफेमध्ये सारखं सारखं जाऊन जेवण घेण्यापेक्षा एकदाच काय ते जास्त ताटात वाढून घेतात. काही वेळा आपण जास्त खातो आणि त्यामुळे अॅसिडिटी आणि लठ्ठपणासारखे त्रास होतात.

उभं राहून जेवताना अनेकदा आपण खूप घाईत जेवतो. त्यामुळे ठसका लागणे किंवा नाकात घास जाण्यासारखे प्रकार होतात.

उभं राहून खाल्याने आपल्या शरीराला योग्य ते पोषक घटकही मिळत नाहीत. त्यामुळे नेहमी प्रयत्न करा की तुम्ही जमिनीवर बसून जेवाल. तेच आरोग्यदायी असतं.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News