सिद्धगड किल्ल्याबद्दल जाणून घ्या ही माहिती

किरण हनुमंत मंगलळे
Wednesday, 1 May 2019

प्राचिनकाळी मालवण बंदर, आचरा बंदर या ठिकाणी उतरणारा माल अनेक मार्गांनी घाटावरील बाजारपेठात जात असे. या मार्गांचे रक्षण करण्यासाठी त्याकाळी मोक्याच्या जागी किल्ले बांधण्यात आले.

सिंधुदूर्ग जिल्ह्यातील सिध्दगड हा किल्ला मालवण, आचरा बंदरहून घाटमाथ्यावरील आजरा या बाजारपेठेकडे जाणार्‍या मार्गावरील घोटगीच्या घाटावर व कसाल नदीवर लक्ष ठेवण्यासाठी बांधण्यात आला होता.

गडावर प्रवेश केल्यावर आपल्याला लांबवर पसरलेल्या जांभ्या दगडाचे पठार दिसते. मालवणी भाषेत याला काप किंवा सडा म्हणतात. या सड्यावर वस्ती आहे, त्याला सिध्दगडवाडी म्हणतात. या वाडीत असलेली छोटीशी पण टुमदार अशी शाळा पाहून मस्तच वाटते कारण इथे असलेली साधी सोपी सजावट आणि pictorial पद्धतीने दाखवलेली माहिती जी चिमुकल्यांना समजायला खूपच सोयीस्कर ठरते.

इथून पुढं आलोत की मग भला मोठा खंदक, जवळपास नष्ट झालेले प्रवेशद्वार, भली मोठी विहीर, सदरेचे अवशेष आणि प्राचीन महादेव मंदिर पाहून घेतले की आपले दुर्गदर्शन संपते.

सल्ला :- 

१.गडावर खूप झाडी असल्यामुळे शक्यतो आपले शरीर पूर्ण पणे झाकले जाईल याची खबरदारी घ्यावी.

२.गडावर जाण्याच्या मार्गावर खूपच माती असल्यामुळे आणि चड असल्यामुळे दुचाकी व नीट चालवून घ्यावी. वेड्या खुळ्या सारखे कसेपण स्टंट करणे महागात पडू शकते.

किंवा

कणकवलीहून मुंबई-गोवा महामार्गाने कुडाळकडे जाताना कसाल गावाच्या (१ किमी) अगोदर ओवळीचे फाटा उजव्याबाजूस आहे. तेथून ओवळीये २ किमी वर आहे
 
Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News