सियाचिन; जिथे फक्त भारताचा सैनिकच उभा राहू शकतो, चौघेजण शहिद
Siachen Glacier सियाचिन एक असं ठिकाण, जिथे गोळ्यांपेक्षा नैसर्गिक आव्हांनाशी सामना करावा लागतो.
Siachen Glacier : सियाचीनमध्ये तैनात सैनिकांना शत्रूच्या गोळ्यांपेक्षा तिथल्या नैसर्गिक आव्हानांशीच मोठा सामना करावा लागतो. बर्फाच्छादित पर्वत आणि खोल खंदकांच्या दरम्यान येथे जीवन किती कठीण आहे हे तिथे सेवेसाठी तैनात असलेल्या जवानालाच माहित असते.
हिमस्खलनामुळे सियाचीन येथे चार सैनिकांचा जीव गमावावा लागला. सियाचिन हा काश्मिरमधील भारत आणि पाकिस्तान यांच्यातला दीर्घ काळापासून आस्मितेचा प्रश्न म्हणून उभा आहे, या परि.सरात सैनिकांना शत्रूंपेक्षा जास्त तिथे येणाऱ्या नैसर्गिक आव्हानांशीच सामना करावा लागणारे रणांगण म्हणून ओळखले जाते.
असे म्हटले जाते की प्रतिकूल हवामानामुळे दरमहा सरासरी दोन सैनिक तरी या ठिकाणी शहिद होत असतात. 1984 ते आतापर्यंत जवळपास 900 सैनिक या हिमस्खलनामुळे शहीद झाल्याचा रिपोर्टही समोर येत आहे.
सियाचिनमध्ये उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव वगळता जगातील दुसर्या क्रमांकाची हिमनदी येथे आहे. काराकोरमच्या हिमाच्छादित शिखरावर हा हिमाच्छादित प्रदेश आढळतो. जिथे दूरदूरपर्यंत जीवसृष्टी असल्याचे दिसून येत नाही. सुमारे 20 हजार फूट उंचीपासून सुरू होणारी ही हिमनदी तब्बल 45 मैल लांब आहे.
सियाचिनचा अर्थ
सियाचीन दोन शब्दांनी बनलेला आहे, ज्यामध्ये सिया म्हणजे गुलाब आणि चिन म्हणजे खोरे. अशाप्रकारे सियाचीनच्या नावाचा अर्थ गुलाबांचा घाट म्हणून ओळखला जात असला तरी तिथल्या परिस्थितीला पाहून जवानांसाठी तो प्रदेश गुलाबाच्या काट्यांप्रमाणे आहे.
सियाचिन हवामान
सियाचिनला जवळजवळ आठ महिन्यांपर्यंत बर्फाचा जाड थर असतो. साधारणत: तापमान शून्य ते दहा अंश सेल्सिअसपर्यंतच असते, तर ऑक्टोबर ते मार्च दरम्यान हिवाळ्यामध्ये जोरदार घसरण होते आणि तेथील तापमान काहीदा वजा 50 डिग्री सेल्सिअसपर्यंत जाते. यावेळी, एक बर्फाळ वादळ ताशी सुमारे 200 किलोमीटर वेगाने वाहते.