'ही' अभिनेत्री घेणार लग्नाच्या पहिल्या वर्षातच काडीमोड

यिनबझ टीम
Tuesday, 21 January 2020

जपळपास वर्षभरापूर्वीच कोणालाही न सांगता अभिनेत्री श्वेता बसू प्रसादने लग्न केले होते. पण लग्नाच्या एक वर्षातच तिने आपल्या पतीपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे.

जपळपास वर्षभरापूर्वीच कोणालाही न सांगता अभिनेत्री श्वेता बसू प्रसादने लग्न केले होते. पण लग्नाच्या एक वर्षातच तिने आपल्या पतीपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. अशी माहिती श्वेताने स्वत: सोशल मिडीयाच्या माध्यमातून दिली आहे. तिने आणि तिचा नवरा रोहित मित्तल या दोघांनी मिळून घटस्फोटासाठी अर्ज केला असल्याचेदेखील तिने सांगितले आहे.

स्पायडर फिल्म अभिनेत्री श्वेता बसू प्रसादने काही काळापूर्वी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करुन पती रोहित मित्तलपासून विभक्त होण्याची घोषणा केली होती. यावेळी तिने सांगितले की परस्पर संमतीने या जोडप्याने विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय लग्नानंतर एका वर्षानंतरच तिचा घटस्फोट का झाला या प्रश्नालाही श्वेताने उत्तर दिले आहे.

रोहित आणि मी खूपच फ्रेंडली आहोत. आधीही यासंदर्भात मी तुम्हाला माहिती दिली होती. आम्ही दोघांनी मिळून  एकमेकांपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे.

कल्की असेही म्हणते की, माझ्या करिअरमध्ये रोहितने मला खूप मदत केली. त्याबाबतीत मी त्याची फॅन आहे. तो एक हुशार चित्रपट निर्माता आहे. मला आशा आहे की आम्ही कधीतरी एकत्र कामदेखील करू. आम्ही 5 वर्ष प्रेमसंबंधात होतो, पण आता आम्हाला हे सगळं थांबवायचं आहे. आम्ही आमचं पतीपत्नीचं नातं जरी इथं थांबवलं असलं तरी आम्ही नेहमीच मित्र एकत्र राहू. म्हणून राहू.

13 डिसेंबर 2018 रोजी श्वेता आणि चित्रपट निर्माता रोहित मित्तल लग्नबंधनात अडकले होते. त्यांचे लग्न पुण्याच्या ग्रॅंड हयातमध्ये झालं होतं. त्यांचा संपूर्ण लग्नरिवाज बंगाली रितीरिवाजाप्रमाणे झाला होता.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News