श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव

शिल्पा नरवडे
Tuesday, 11 August 2020
  • राधिकेची भक्ती बासरीची गोडी लोण्याचा स्वाद सोबतीला गोपिकांचा रास मिळून साजरा करू श्रीकृष्ण जन्माष्टमीचा दिवस खास 
     

"गेला हरी कुण्या गावा,  कुणाला नाही कसा ठावा" अशा वेगवेगळ्या गवळीनी संपूर्ण भारताला वेड लावणाऱ्या आज श्रावण महिन्यात वद्य अष्टमी या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदिशाळेत श्रीकृष्णाचा जन्म झाला, म्हणून त्या दिवशी आनंदोत्सव साजरा करण्याची परंपरा आहे. श्रीकृष्णाचा जन्म हा जन्माष्टमी म्हणजे गोकुळ अष्टमी,  हा कृष्ण जन्माचा दिवस म्हणून साजरा करतात.

 कृष्ण जन्माचा दिवस संपूर्ण भारतात मोठया आनंदाने साजरा करतात. हा उत्सव गोकुळ, मथुरा, द्वारका, वृंदावन, जगन्नाथ पुरी या ठिकाणी तर मोठ्या जल्लोषात हा उत्सव साजरा केला जातो. गोकुळ अष्टमीच्या दिवशी उपवास करण्याची पद्धत आहे. या उत्सवासाठी तयार केलेल्या विशिष्ट प्रसादास गोपालकाला असे म्हणतात. महाराष्ट्रामध्ये विशेषतः कोकणामध्ये तर दुसऱ्या दिवशी सुद्धा दहीकाला साजरा करून मगच उपवास सोडला जातो. “गोविंदा आला रे आला” अशी अनेक गाणे म्हणत लहान मुलांपासून ते थोरामोठ्यापर्यंत नाच गाणी करून दहीहंडी फोडतात. या दिवशी महाराष्ट्रामध्ये उंच मडक्यात दही दुधाने भरलेला हंडा ठेऊन मानवी मनोऱ्यावरून तो हंडा फोडण्याचा   धाडसी खेळ गोविंदा करत असतात.

गोपाल म्हणजे गायीचे पालन करणाऱ्या कृष्णाच्या जन्माच्या निमित्ताने खास करुन काल्याचा प्रसाद तयार केला जातो. या दिवशी सर्वजण एकत्र येऊन काल्याच्या प्रसादाचा लाभ घेतात. वाजवतो पावा तो कृष्ण मुरारी वेडी झाली राधा ऐकून बासरी, अरे कान्हा कृष्ण मुरारी, यमुनेतीरी मी पाहिला हरी आशा वेगवेगळ्या गवळनी नाचून गाऊन हा उत्सव साजरा करतात.

    

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News