श्री माँ विद्यालयाचा एस टी चषकावर विजयी डंका

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 27 February 2020

ठाणे :  मुंबई क्रिकेट असोसिएशनच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या १६ वर्षांखालील एच. टी. भंडारी ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेत श्री माँ विद्यालय संघाने वसंत विहार शाळेला पराभूत करत विजय संपादन केला. कल्याण येथील ऑल सेंट हायस्कूलच्या मैदानावर नुकताच अंतिम सामना पार पडला.

ठाणे :  मुंबई क्रिकेट असोसिएशनच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या १६ वर्षांखालील एच. टी. भंडारी ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेत श्री माँ विद्यालय संघाने वसंत विहार शाळेला पराभूत करत विजय संपादन केला. कल्याण येथील ऑल सेंट हायस्कूलच्या मैदानावर नुकताच अंतिम सामना पार पडला.

 
वसंत विहार शाळेने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पहिल्या डावात वसंत विहार शाळेने १० गडी बाद ११२ धावा केल्या. श्री माँ विद्यालयाच्या जयेश पाटील याने १० षटकांत ४ गडी, दक्ष शर्माने १४ षटकांत ३, तर ओमकार खोसेने ५ षटकांत ३ गडी बाद केले. आपल्या पहिल्या डावात फलंदाजी करतांना श्री माँ विद्यालयाने १० गडी बाद १६३ धावा केल्या होत्या. यात जयेश पाटीलने धडाकेबाज ६८ धावा, अमित सहानी याने ३९ तर आर्या अग्रवाल याने २२ धावांची महत्वपूर्व खेळी केली. श्री माँ विद्यालयाला ५१ धावांची आघाडी मिळाली. 

दुसऱ्या डावात वसंत विहार संघाने ३ गडी बाद १४७ धावांवर आपला डाव घोषित केला. श्री माँ विद्यालयाच्या जयेश पाटील आणि दक्ष शर्माने प्रत्येकी १ गडी बाद केला. श्री माँ विद्यालयाने दुसऱ्या डावात ५८ धावा केल्या. वेदांत सिंगने ३५ धावा तर अमित सहानी याने १४ धावा केल्या. पहिल्या डावाच्या खेळीवर श्री माँ विद्यालयाला विजयी घोषित करण्यात आले. श्री माँ विद्यालयाच्या या यशाबद्दल शाळेचे सीईओ राजन अय्यर, मुख्याध्यापिका चित्रा अय्यर यांनी प्रशिक्षक दर्शन भोईर, प्रितेश भोईर यांचे आणि खेळाडूंचे अभिनंदन केले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News