श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयात आय. सी. आय. सी. आय बँकेचा भरती मेळावा

विना जाधव, उमरगाव
Monday, 2 December 2019

उमरगाव - श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयात आय. सी. आय. सी. आय बँकेची मुलाखत घेण्यात आली. या मुलाखतीसाठी विद्यार्थ्यांचा खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण पूर्ण होताच त्यांच्या हातात नौकरी असावी या तत्वाने विद्यालयाने उत्कृष्ट अशा उपक्रमाचे दि. २६ नोव्हेंबर २०१९ रोजी आयोजन केले.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रा. डॉ. जी. एच. जाधव सर तसेच प्रमुख उपस्थिती आय. सी. आय. सी. आय बँकेचे सर व्यवस्थापक विवेक आजमाने सर उपस्थित होते. तसेच उपप्राचार्य प्रा. डॉ. डी. व्ही. थोरे सर (कला शाखा), उपप्राचार्य डॉ. विलास इंगळे सर (विज्ञान शाखा) तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक- प्राध्यापिका, विद्यार्थी– विद्यार्थिनी उपस्थित होते.

यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपप्राचार्य प्रा. डॉ. एस. एन. अस्वले सर यांनी केले तर प्रा. डॉ. सी. डी. करे सर यांनी आभार मानले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News