श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयात संविधान दिन उत्साहात साजरा

विना जाधव, उमरगाव
Monday, 2 December 2019

उमरगाव - श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय आणि राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात संविधान दिन अतिशय उत्साहाने साजरा करण्यात आला. २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून संपूर्ण देशभर साजरा केला जातो. 

त्यानिमित्ताने विद्यालयात सर्व विद्यार्थ्याकडून राज्यशास्त्र विभागाचे प्राध्यापक एस. इ. बिराजदार यांनी संविधानाच्या प्रस्ताविकेचे वाचन करून घेतले.

यावेळी कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जी. एच जाधव सर तसेच उपप्राचार्य प्रा. डॉ. डी. व्ही. थोरे, उपप्राचार्य प्रा. डॉ. विलास इंगळे, उपप्राचार्य प्रा. डॉ. एस. एन. अस्वले सर, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा. राजू सूर्यवंशी सर, प्रा. व्ही. डी. देवरकर सर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. ए. डी. देशमुख सर यांनी केले, तर आभार प्रा. राजू सूर्यवंशी सर यांनी मानले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News