बेसबाल स्पर्धेत श्रेयश, भार्गवला सुवर्ण पदक

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 7 February 2020
  • संघाचे प्रशिक्षक रामेश्वर राठोड यांनी सुवर्ण पदक प्राप्त करण्यासाठी श्रेयश व भार्गवला मार्गदर्शन केले.
  • त्यामूळे दोघांनाही आपल्या यशाचे श्रेय आई-वडिल व गुरुजनांना दिले आहे.

अकोला : नुकत्याच बिलासपूर (छत्तीसगड) येथे झालेल्या राष्ट्रीय ‌बेसबाल स्पतर्धेत  हिंगणारोड कौलखेडयेथील स्कुल ऑफ स्कॉलर्सचे विद्यार्थी श्रेयश रामेश्वर राठोड व भार्गव संतोष देवने सुवर्ण पदक पटकावून बाजी मारल्याने अकोल्याच्या शिरपेचाता मानाचा तुरा खोवला गेला. दोघांवर कौतुकाचा वर्षांव होत आहे.

 संघाचे प्रशिक्षक रामेश्वर राठोड यांनी सुवर्ण पदक प्राप्त करण्यासाठी श्रेयश व भार्गवला मार्गदर्शन केले. त्यामूळे दोघांनाही आपल्या यशाचे श्रेय आई-वडिल व गुरुजनांना दिले आहे.

त्यांच्या या यशाबद्दल स्कुल ऑफ स्कॉर्लसच्या मुख्याध्यापीका सौ. मनिषा उंबरकर, प्र.शा.अधिकारी राजेशकुमार कड, उपमुख्याध्यापीका सौ. कोमल लहरीया, क्रीडा प्रमुख राजेंद्र डोंगरे, विजय महल्ले, परेश घाटोळे अदिती बुगदानी, शुभांगी आखरे, अकोला बेसबॉल सचिव नारायण बत्तुले, अध्यक्ष एन.डी.पखाले, इंद्रजीत नीतनवार, जिल्हा क्रिडा अधिकारी आसाराम जाधव, दिनकर उजाळे यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News