श्रावण सरी

भक्ति पुराणिक
Wednesday, 7 August 2019

भावाबहिणीचं गोड नातं
प्रेम हे वाढतच जातं, 
राखी छान शोभते हातात
बहिणीची माया रे मनात...

"माझ्या अंगणी आली गं 
हिरव्या श्रावणाची सर, 
चिंब पावसात न्हाऊ
गाणी गाऊ तालावर...
श्रावणाची सर आली
त्यात भिजली फुलवेली, 
बहरल्या गर्द रानवेली
मन आनंदुन गेली... श्रावणाची मोठी ख्याती
तरारली काळी माती,
डोलु लागे शेती-भाती
एकरुप झाली नाती...
श्रावणाचे गीत गाऊ
मुक्त होऊनीया डोलु, 
हिरवी सृष्टी सारी पाहु
रुप मनी साठवुनी ठेऊ... 
श्रावणात येती सणवार
येई श्रावणी सोमवार, 
चला जाऊ शिवमंदिरी
चढवु शिवा जलाधार...
श्रावणात प्रगटे परमात्मा
भक्तीरसाचा सुप्त आत्मा, 
वंदु सारे मिळुनी त्याला
आपला श्रीकृष्ण जगदात्मा... 
भावाबहिणीचं गोड नातं
प्रेम हे वाढतच जातं, 
राखी छान शोभते हातात
बहिणीची माया रे मनात...
मंगळागौरीचा चाले जागर
उखाण्यांना येई बहर, 
सुवासिनी लेकी बाळी
पुजिती भावे शिवशंकर... 
राष्ट्रध्वज तो विजयाचा
ताठ मानेने फडकवायचा, 
राष्ट्रीय सण स्वातंत्र्य दिनाचा
अभिमान आपल्या भारतमातेचा... 
तनामनात भरे श्रावण
दाटुन येती का आनंदघन, 
एकात्मतेचे सारे सण
एकोप्याने आनंदी जीवन... 
पुन्हा यावी श्रावणसर
यावा आठवणींना भर
मांगल्यानं पावित्र्यानं
उजळो अवघे चराचर...!"

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News