बागी-३ मध्ये श्रद्धा कपूरच्या शिव्यांचा पाऊस

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 4 March 2020
  • नुकताच चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांसमोर आला असून यामध्ये टायगरचा जबरदस्त ऍक्शन सिन पाहायला मिळत आहे.

टायगर श्रॉफ आणि श्रद्धा कपूर यांचा बागी ३ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात श्रद्धा कपूर देखील दिसणार आहे. नुकताच चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांसमोर आला असून यामध्ये टायगरचा जबरदस्त ऍक्शन सिन पाहायला मिळत आहे. या ट्रेलरची चर्चा सध्या जोर धरतेय ती फक्त श्रद्धा कपूरमुळे..! सेन्सर बोर्डाने अनेक गोष्टींवर कात्री मारल्याचे दिसून येत आहे. 

सुरुवातीला अर्धी शिवी देत उर्वरित  शिवी 'बीप' केली होती. मात्र आता ही दृश्ये सेन्सॉरने कात्री मारली आहे. या चित्रपटात त्याठिकाणी मिळता-जुळता पर्यायी शब्द वापरण्यात आला आहे.

त्यासोबतच सिनेमातील बरेचसे सीन हटविण्यात आले आहेत. यामध्ये लहान मुलांना करण्यात आलेली मारहाण, व्यक्तीला जाळण्यात आलेली दृश्ये, अपमानास्पद दिलेली वागणूक अशी दृश्ये यातून काढून टाकण्यात आलेली आहे. 

यासोबतच या सिनेमात दिशा पाटनीचे आयटम सॉन्ग देखील आहे. यातील देखील अनेक सीन्स काढण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरमधील सीन्समुळे आणि गाण्यामुळे तो सोशलमीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेचा विषय ठरत आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News