या CEO चा डान्स पहिला तूमच्या बॉसला दाखवा आणि सांगा...

यिनबझ टीम
Friday, 21 February 2020

वेल्सपेन इंडिया लिमिटेडच्या हेड एग्जीक्यूटिव ऑफिसर(सीईओ) आणि जॉइंट मॅनेजिंग डायरेक्टर दिपाली गोयनका यांचा एक व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेचा विषय बनला आहे.

मित्रांनो ताण तणावाची खूप कारणे असतात. काहीदा हेच ताणतणाव आपल्या ऑफिसमधूनच सुरू होत असतात. त्यासाठी आपण कामाच्या ठिकाणी गाणी ऐकणे, रिफ्रेश वाटण्यासाठी ऑफिसच्या बाहेर फिरून येणे किंवा ताण कमी करण्यासाठी आपल्याला आवडतील त्या गोष्टी करतो, अशातच एका बड्या कंपनीतील CEO चा एक छानसा व्हिडीओ संपूर्ण देशभर व्हायरल होत आहे.

वेल्सपेन इंडिया लिमिटेडच्या हेड एग्जीक्यूटिव ऑफिसर(सीईओ) आणि जॉइंट मॅनेजिंग डायरेक्टर दिपाली गोयनका यांचा एक व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेचा विषय बनला आहे. या व्हिडीओमध्ये दिपाली आपल्या ऑफिसमधल्या कर्मचाऱ्यासोबत डान्स करताना दिसून येतात. हा व्हिडीओ हर्ष गोयनका आपल्या ट्विटरवरून शेअर करताना लिहितात की एक CEO, आपल्या ऑफिसमधल्या कर्मचाऱ्यांसोबत डान्स करतो, हे आपल्याला कुठेच पाहायला मिळत नाही, मात्र दिपाली ते करताना दिसत आहे, आपल्या ऑफिसमधील कर्मचाऱ्यांमध्ये एक सही माहोल तयार करायची ही एक छान पध्दत आहे.

सध्या या व्हिडीओला 5 लाख 80 हजार लोकांनी पाहिलाय. इतकच काय तर बॅडमिंटन पट्टू ज्वाला गुट्टानेदेखील या व्हिडीओला लाईक केलं आहे. अनेक बड्या कंपनीच्या CEOनी देखील या व्हिडीओचं कौतुक केलय.

ऑफिसमधल्या अनेक कर्मचाऱ्यांनी या व्हिडीओला घेऊन खूप चांगल्या प्रतिक्रिया शेअर केल्या आहेत. त्यांच्या मते ऑफिसमध्ये फक्त काम करत राहिले तर त्या कामाला काहीच अर्थ नसतो, काहीप्रमामात मनोरंजन असले, की होत असलेले काम आणखी खुलते.

हर्ष गोयनका यांनी आपल्या हँडलवरून शेअर केलेला व्हिडीओ स्वत: दिपाली शेअर करत आनंद महिंद्रा, गौतम आदानी आणि किरण शॉ अशा बड्या व्यवसायिकांना टॅग करत ही माझी काम करण्याची जागा आणि तुमची? असा सवाल केला आहे.

आता हा सगळा व्हिडीओ पाहिल्यानंतर आणि त्या व्हिडीओच्या कमेंट वाचल्यानंतर तुम्हीही तुमच्या बॉसला ऑफिसमध्ये डान्स करायला तर सांगू नका मात्र असच काहीसं मनोरंजनाच्या गोष्टी करायाला नक्की सांगा.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News