दहीहंडीच्या खर्चातून गरजूंना मदत करावी का?

रसिका जाधव
Wednesday, 12 August 2020
  • आजची चर्चा, माझा अधिकार, माझे मत…
  • संपूर्ण महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे.
  • त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व ठिकाणी दहीहंडी रद्द केली आहे.
  • परंतु दरवर्षी याच दहीहंडीसाठी लाखात बक्षीसे ठवलेली असतात.

संपूर्ण महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व ठिकाणी दहीहंडी रद्द केली आहे. परंतु दरवर्षी याच दहीहंडीसाठी लाखात बक्षीसे ठवलेली असतात. परंतु या वर्षी दहीहंडी रद्द केल्यामुळे त्यांच बक्षीसाच्या पैसाच योग्य तो वापर करावा, म्हणजेच गरीब, गरजू आणि कोरोना रूग्णासाठी वापरावा. आताच्या परिस्थिती काही लोकांना एकवेळचे पोटभर जेवण देखील मिळत नाही त्या लोकांना रेशन भरून द्यावे जेणेकरून त्यांना जेवायला तरी मिळेल नाहीतर काही दिवसांनी आपल्या ऐकायला मिळेल की, अन्न न मिळाल्यामुळे भूकेने एक गरीबाचा बळी गेला, म्हणून अशा व्यक्तींना या पैशांनी मदत करावी. काही विद्यार्थांनाकडे ऑनलाइन शिक्षणाच्या देखील सुविधा नसल्यामुळे त्यांना शिक्षण घेता येत नाही. त्यामुळे अशा गरजू विद्यार्थांना त्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. कोरोनामुळे दहीहंडी सर्वत्र रद्द करण्यात आली आहे, मग जे पैसे दहीहंडीसाठी खर्च केले जात होते तेच पैसे गरजूंना मदत म्हणून वापरले तर, तुम्हाला काय वाटतं? याच विषयावर यिनबझच्या अनेक ग्रृपवर मनोसत्त्क चर्चा केली. या चर्चेतील काही निवडक मत आणि प्रतिक्रिया येथे देत आहोत.

दरवर्षी दहीहंडी उत्सव प्रचंड उत्साहात साजरा होतो, ठाण्याच्या दहीहंडी उत्सवाने संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. ठाण्याचा दहीहंडी उत्सव आता जागतिक स्तरावर पोहोचला आहे. परदेशी मंडळीदेखील शहरातील दहीहंडी उत्सवाला उपस्थिती लावत असतात, पण सध्याची परिस्थिती लक्षात घेता दहीहंडी रद्द करणे, हेच प्रत्येकाच्या आरोग्याच्या आणि समाजाच्या दृष्टीने योग्य आहे.

दहीहंडी उत्सवासाठी मोठमोठी पारितोषिके देण्यात येतात. या रक्कमाही मोठ्या असतात. मात्र, हा सण साजरा करताना मोठ्या प्रमाणावर तरुण गोविंदा एकत्र येतात. जर गोविंदा उत्सवात गर्दी झाली, तर सध्या सरकार करत असलेल्या उपाययोजना फोल ठरण्याची शक्यता आहे.

या सर्व बाबींचा विचार करुन आणि सरकार ने केलेल्या आवाहनानुसार यंदा  दही हंडी रद्द करण्याचा निर्णय योग्य राहिल. विविध प्रकारची पारितोषिके तसेच इतर नियोजनापोटी होणारा खर्च कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रुग्णवाहिका तसेच इतर उपाययोजनांसाठी वापरावा. सर्व मंडळानी यंदाचा दहीहंडी उत्सव रद्द करुन आयोजनाचा खर्च कोरोनाबाधितांसाठी वापरावा, लॉकडाऊन मध्ये बरेच लोक हाताला काम नसल्याने उपाशी राहत आहेत. त्यांना रेशन पुरवले पाहिजे, दहीहंडीचा खर्च टाळून बरीच चांगली काम त्या पैशांत होऊ शकतात.

विपुल जानराव

प्रत्येक वर्षीचा दहीहंडीचा सण आपण अतिउत्साहात साजरा करतो. परंतु यंदा सर्वत्र कोरोनाचा कहर असल्यामुळे दहीहंडी रद्द करण्यात आली आहे. दरवर्षी दहीहंडी फोडणाऱ्यांना लाखोंच बक्षीस दिले जात. यावर्षी दहीहंडी रद्द करण्यात आल्यामुळे त्यासाठी खर्च केल्या जाणाऱ्या पैशांनी गरजूंसाठी आवश्यक असणाऱ्या वस्तू म्हणजेच किराणा सामान, भाजी, अत्यावश्यक वस्तू खरेदी करून त्यांचे वाटप करावे.

डॉक्टर, नर्स हे स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आपला जीव वाचवण्यासाठी  कार्यरत आहेत. कित्येक हॉस्पिटलमधील डॉक्टर, नर्स यांना स्वतःच्या संरक्षणासाठी पीपीई किट्स उपलब्ध नाही त्यांनाही या पैशांनी पीपीई किट्सच वाटप करू शकतो.

श्रध्दा ठोंबरे

दहीहंडी हा सण महाराष्ट्रातच नाही तर विदेशात सुद्धा मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. परंतु आता करोना संकट पाहता आता कोणतेच सण उत्सव मोठ्या उत्सवात साजरे करू शकत नाही जेवढी गर्दी कमी असेल असेच सण उत्सव आपण साजरे करू शकतो.

दरवर्षी दहीहंडी ह्या सणवार लाखो रुपयांचे बक्षीस घेण्यासाठी मंडळाची चढाओढ असते तू सात थर लावले तर मी आठथर लावतो ह्या मध्ये पण चढाओढ असते परंतु ह्या वर्षी असे काही दिसून नाही येणार परंतु पुढच्या वर्षी नक्कीच ह्या पेक्षा चागले दिवस येतील.

आता सर्वच गोविद मंडळे प्रत्येक सण मोठया उत्सवात न करता त्यातील काही रक्कम ही सामाजिक उपक्रमामध्ये वाटली जाते. त्या मध्ये काही अन्न-धान्य वाटप केले जाते, कोणी कपडे, तर कोणी पैसे वाटले जातात. ज्याच्या कडून जशी मदत होईल तशी ते मदत करतात.

आता गोविंद मंडळे देखील नव नवीन उपक्रम राबवतात, त्या मध्ये गरिबांना मदत करणे, रक्तदान शिबिर भरवणे, कोणी एखाद गाव दत्तक घेऊन त्या गावामध्ये शाळा बांधणे, वही-पुस्तके वाटप करणे ह्या सारखे उपक्रम राबवतात.

महेश सोरटे

नेहमी आपण दहीहंडी अगदी जल्लोषात साजरी करतो. पण या वर्षी दहीहंडी कोरोनासारख्या संसर्गजन्य रोगामुळे आपल्याला साजरी करता येणार नाही, याचे दुःख आहेच. पण त्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पैशांचा यावर्षी अनेक गरजूच्या कामांसाठी उपयोग केला जाऊ शकतो. 

कोमल साळुंखे

दहीहंडी हा सण संपर्ण जगातच काय तर वेगवेगळ्या देशात मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. परंतु या वर्षी कोरोनाच्या महामारीमुळे कोणतेच सण आपल्याला मोठ्या उत्साहात साजरे करता आले नाही. आणि त्यात दहीहंडी हा सण सुद्धा आपल्याला साध्या पद्धतीने साजरा करावा लागला.

दरवर्षी हा सण मोठया संख्येने चढाओढीने सगळे गोविंदा एकत्र येऊन थाटामाटाने साजरा करतात. या सणाला तर लखोरुपयांचा खर्च देखील केला जातो. पण या वर्षी तो खर्च वाचणार आहे. त्यामुळे दहिहंडीला लागणार खर्च हा या देशातील गोरगरीब जनतेच्या आरोग्यासाठी तसेच त्यांना लागणाऱ्या दैनंदीन जीवनातील वस्तूंसाठी देण्यात यावा. तसेच खेड्यापाड्यातील ज्या गरजू विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण घेणे शक्य नाही, त्या मुलांना ऑनलाईन साधनसामग्री घेऊन देण्यात ते पैसे खर्च करावे. कोरोनाच्या महामारीमुळे दहीहंडी तर रद्द झाली. त्यामुळे दहीहंडीचा पैसा गरजूंना दिला तर त्यातून ते दोन वेळचे जेवण तसेच त्यांना लागणाऱ्या दैनंदिन जीवनातील ठराविक वस्तू खरेदी करण्यासाठी वापरतील.

शिल्पा नरवडे

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News