कोरोनाच्या काळात ज्या पध्दतीत लग्न होतात ती पध्दती कायमस्वरूपी ठेवावी का ?

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 8 August 2020
  • आजची चर्चा, माझा अधिकार, माझे मत...
  • भारतामध्ये कोरोना महामारी संकट निर्माण झाले आहे.
  • आताच्या परिस्थिती लग्न करणे ही युवकांसाठी मोठी समस्या निर्माण झाली.

भारतामध्ये कोरोना महामारी संकट निर्माण झाले आहे. आताच्या परिस्थिती लग्न करणे ही युवकांसाठी मोठी समस्या निर्माण झाली. कारण खूप लोकांचे साखरपुडे होवून लग्न एप्रिल आणि मे महिन्यात होणार होते. परंतु कोरोनाच्या या वाढत्या प्रादुर्भावामुळे ही सर्व लग्न पुढे ढकलण्यात आली आहेत. परंतु हे संकट काही कमी होत नाही. त्यामुळे दोन्ही कुटुंबानी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे तो म्हणजे साध्या पद्धती आणि कमी खर्चात तसेच कमी माणसात लग्न सोहळे करण्यास सुरूवात झाली आहे. जर ही प्रथा पुढे अशीच चालू राहिली तर खरंच या वाईट काळात काहीतरी चांगल झाल्याचा आनंद मिळेल. कोरोनामुळे अत्यंत साध्या पद्धतीत आणि कमी खर्चात लग्न सोहळे होत आहेत, पुढेही ही पद्धत कायम ठेवावी का?  तुम्हाला काय वाटतं? याच विषयावर यिनबझच्या अनेक ग्रृपवर मनसोक्त चर्चा केली. या चर्चेतील काही निवडक मत आणि प्रतिक्रिया येथे देत आहोत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी न करण्याचे आवाहन प्रशासनाने केल्यामुळे सध्या साध्या पद्धतीने लग्न समारंभ पार पडत आहेत आणि भविष्यातही अशाच पद्धतीने लग्न समारंभ व्हावेत,  अशी इच्छा अनेकांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे लग्नातील मान-अपमान तसेच होणारे खर्चही मोठ्या प्रमाणात वाचणार आहेत. कमी खर्चात पण लग्न एकदम चांगल्या पद्धतीने होऊ शकते. माणसांच्या जेवणाची व्यवस्था, मान सम्मान, डीजे  इत्यादी खर्चामुळे मुलीचे वडील कर्ज बाजारी होऊन आत्महत्या करतात अशा घटना काही ठिकाणी घडल्या आहेत. पण लॉकडाऊनमुळे कमी खर्चात ही उत्तम पद्धतीने लग्न होउ शकते हे लोकांना समजल आहे. अशी पद्धत पुढे ही चालू ठेवली तरी गरीब कुटुंबातही सुखी वातावरण असेल.

विपुल जानराव

अत्यंत साध्या पद्धतीने आणि कमी खर्चात लग्न कार्य करणे हे खुप चांगले आहे आणि सर्वांना परवडेल असा भाग आहे. आणि कोरोनामुळे ही प्रथा आपल्या समाजात निर्माण झाली आहे हे फक्त पर्याय नसतानाचा मार्ग शोधून काढला आहे कारण जर कोरोना नसता आणि सर्वांच्या मनात जर असे साध्या पद्धतीने लग्नकार्य करावे असे का वाटले नाही ? म्हणून लग्नकार्यसाठी विलंब किंवा मंडप वालेचे नुकसान,  इतर आयोजित केलेल्या भविष्यातील धोरणामुळे आणि सरकारने काही फायदे आणि तोटे यांचा विचार करून हा मार्ग काढला आहे.

पण जर हाच मार्ग पुढे चालू ठेवला तर सर्वसामान्य शेतकरी यांना मुलींच्या लग्नाला कधी कर्ज काढावे लागणार नाही. मुलांच्याकडून ज्या जास्तीच्या अपेक्षा आहेत त्यांना आळा बसेल. अजून एक सरकारने धोरण काढले पाहिजे की, तालुका स्तरावर प्रत्येकी एक किंवा दोन वधू वर सुचक केंद्र हे सरकारी धोरणानुसार चालवले पाहिजे जेणेकरून सर्वांना त्याचा फायदा होईल आणि सर्व कार्यक्रम सुरळीत चालू शकतील. याचा फायदा गरीब मुलां-मुलींच्या आई वडिलांना नक्कीच होईल, आणि जो लग्नाचा वाढीव वायफळ खर्च आहे तो त्या दोघांच्या पुढील संसारासाठी देण्यात आला की त्यांचे आयुष्य देखील सुरळीत होईल. कारण मौज मज्जा साठी हा खर्च होत असतो.

सागर सातवेकर

सोहळा करणे म्हणजे खर्च हा होणारच परंतु कोरोनामुळे लोकांमध्ये गर्दी न करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. त्यामुळे लग्न सोहळ्यात फक्त ५० नातेवाईंकाना एकत्र येण्याची परवानगी सरकारने दिली असून कुठे तरी का होईना उगाच होणारे खर्च कमी झाले आहेत. कारण आताच्या काळातील लग्न सोहळे पाहता यामध्ये अनेक नवनवीन पद्धतींचा समावेश झालेला दिसून येतो. मग कर्ज काढून का होईना ह्या पद्धतीचा समावेश लग्नात केला जातो आणि यामुळे खर्चाचे प्रमाण देखील वाढते ज्यांची आर्थिक परिस्थिती हलकीची आहे ते देखील हे नवीन सोहळे करतात किंवा करावे लागतात. परंतु आपण हे सर्व नवीन ट्रेन्ड करताना आपली संस्कृती कुठे तरी मागे सोडत आहोत हे खरं. कोरोनामुळे का होईना पण आपण थोडक्यात कमी खर्चात आणि पारंपरिक पद्धतीने लग्न सोहळे साजरे करत आहोत. यापुढे देखील असेच केले तरी सर्वसामान्यांना किंवा ज्याची आर्थिक परिस्थिती निट नाही त्यांना देखील लग्न सोहळे आनंदाने आणि समाधानाने करता येतील आणि आपण आपली संस्कृती देखील विसरणार नाही, तसेच आर्थिकदृष्ट्या अडचण निर्माण होणार नाही. त्यामुळे पुढे देखील हे पद्धत कायम ठेवली पाहिजे अस मला वाटते.

अश्लेषा ननवरे

होय,  अत्यंत साध्या पद्धतीत आणि कमी खर्चात लग्न सोहळे करणे ही पद्धत पुढे कायम ठेवली पाहिजे. असे केल्याने तो तणावाखाली जगणारा प्रत्येक बाप आनंदी राहील ज्याला मुलगी आहे. हे गरिबांच्या बाबतीत जास्त आढळते, शेतकरी असो वा सामान्य माणूस,  आपल्याला एक मुलगी आहे आणि तिला चांगल कुटुंब मिळावे म्हणून आपल्याला मुलांकडून करण्यात येईल ती मागणी पूर्ण करणे तसेच एक प्रतिष्ठा जपण्यासाठी मोठ्या थाटामाटात लग्न करणे हा त्या बापासमोर मोठा प्रश्न असतो. त्यामुळे ऐपत नसतानादेखील तो मायबाप कर्ज काढून मुलीचे लग्न करतो.

खेडेगावात तर आर्थिक अडचणींमुळे मुलीला उच्चशिक्षण देखील घेऊ देत नाहीत कारण पुढे तोच पैसा तिच्या लग्नाला उपयोगी पडेल असा समज बाळगला जातो. आणि यातून एखादी मुलगी पुढे येऊन बोलली मला शिकायचे आहे तर,  "शिकून तर आम्हाला कुठे तुझा पगार मिळणार,  सर्व काही सासरी भरती करणार" असेही बोलणारी मंडळी ह्या जगात वावरत आहेत. म्हणा, दोष त्यांच्याही नसतो, कठड्यात चुकीची ठरते ती फक्त माणसाची आर्थिक स्थिती !

सर्व पालकांनी नवीन ट्रेंड्स, प्रतिष्ठा, समाजात मान जपण्यासाठी मोठ्या उत्साहात मुलीचे लग्न न करता अत्यंत साध्या पध्दतीने कमी खर्चात करून तोच पैसा मुलीच्या शिक्षणाला वापरून आपली मुलगी सक्षम बनविण्यासाठी वापरला पाहिजे. जेणेकरून समाजात मुलीच्या शिक्षणावरून तुमची प्रतिष्ठा जपली जाईल. आणि कर्ज काढून लग्न करणारा तो बाप मुलगी ही बोझ नसून आपली आहे, तिला शिकवणे म्हणजे आपले बापप्रति देणं आहे ह्या उद्देशाने जगेल.

आरती औटी

कोरोनामुळे का होईना पण या क्षणी आपण आपल्या संस्कृतीचे पालन करत आहोत. लाखो खर्च करण्यापेक्षा जितकं जमेल तेवढ्यात सोहळा पार पाडू शकतो आणि व्यवस्थित रित्या पार पाडला जाऊ शकतो. यामुळे कोणाचं मन दुःखवल जाणार नाही, दुजाभाव होणार नाही. त्यामुळे ही पार्टी तगडी आहे असं ऐकू येणार नाही. हे मान्य आहे की, लग्न म्हंटल की खर्च होणारच पण कितपत केला पाहिजे हे ही तितकंच महत्वाचं आहे. कोरोनामध्ये कमी खर्चात होणारे लग्नसोहाळे शेवट पर्येंत हे असेच राहिला पाहिजे का ? तर माझं उत्तर हो आहे. प्रत्येक बाप हा आपल्या मुलीच्या सुखासाठी कर्ज काढून का होईना तो थाटात लग्न करतो. पण हे खरच गरजेचं आहे का ?

दिपाली बोडवे

माझं ही वैयक्तिक मत 'होय' असे आहे. लग्न सोहळ्यामध्ये अनावश्यक खर्च हा खूप मोठ्या प्रमाणात होतो. त्यासाठी अनेकांना कर्जही काढावे लागतात. जर लग्न सोहळे हे साध्या पद्धतीत आणि कमी खर्चात झाले तर आपण तो पैसा दुसऱ्या गरजेच्या कामासाठी वापरू शकतो.

श्रद्धा ठोंबरे

होय, ही पद्धत पुढे कायम ठेवावी हे माझे मत आहे. त्यामुळे बऱ्याच मोठ्या प्रमाणात होणारे खर्च टाळता येतील. कोणालाही लग्न करण्यासाठी कर्ज काढावे लागणार नाही.

दिशा सरमळकर

होय, मला ही पद्धत कायम राहावी असे वाटतंय त्याचे कारण असे आहे की, लग्नासाठी आपण पाहतो की, खूप मोठ्या प्रमाणामध्ये खर्च होतो एकतर आजची ही कोरोनाची परिस्थिती अशी आहे त्यात कित्येक लोकांचे उद्योगधंदे ठप्प झालेले आहेत, लोकांना हवं तसं काम नाहीये, कुठेतरी पगारामध्ये कपात झालेली आहे त्यामुळे आर्थिक संकट प्रत्येकावर आहे. त्यामुळे जर लग्नकार्यासाठी लागणारा खर्च आहे. तो वाचला तर नक्कीच त्याचा कुठेतरी पुढे जीवनावश्यक  गोष्टींसाठी वापर करता येईल. दुसरी गोष्ट अशी की आपण पाहतो की लग्नामध्ये कित्येक ठिकाणी अजूनही अप्रत्यक्षरीत्या हुंडा आकारला जातो मग या कोरोनाच्या भितीमुळे का होईना कुठेतरी या हुंडा ही पद्धत आहे. म्हणजे पैशाची देवाणघेवाणी बद्दल फक्त स्तिमित न राहता वस्तूची देवाणघेवाण असते किंवा लग्नाचा मोठा थाटामाटाची अपेक्षा असते. त्यावर कुठेतरी अप्रत्यक्षरीत्या आळा घातला जाईल आणि लोकांना त्यासाठी मोठे कर्ज काढावे लागतात. त्याचा ताणही कमी होईल, त्याचबरोबर लग्नामध्ये मोठ्या प्रमाणात जेवण वाया जाण्याचे प्रकार होतात, कमीत कमी माणसे असल्यामुळे ते नुकसानही कमी होईल.

गार्गी गोरेगावकर

माझं उत्तर अतिशय साहजिक आहे, एखाद्या अत्यंत श्रीमंत आणि समृद्ध माणसाव्यतिरिक्त अन्य कोणालाही असे वाटणार नाही की, ही पद्धत बंद व्हावी. मुख्य प्रश्न हा आहे की, कर्जाचा भलामोठा  मोठा डोंगर बापाच्या डोक्यावर घेऊन आपण आजवर ही प्रथा पुढे का ढकलत राहिलो?  आणि जर आता ही बाब लक्षात आली आहे, तर यापुढे या गोष्टीचे अनुसरण करण्यासाठी किंबहुना या पद्धतीला आपल्या संस्कृतीत स्थान देण्यासाठी वैयक्तिक पातळीवर तसेच कोणते प्रयत्न केले जाऊ शकतात? आणि सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे एखादी चांगली गोष्ट समाजात बिंबवण्यासाठी आपल्याला एका जागतिक महामारीची गरज लागली?

निशांत टाळे

कोरोनामुळे अत्यंत साध्या पद्धतीत आणि कमी खर्चात लग्न सोहळे होत आहेत, पुढेही ही पद्धत कायम अशीच चालू ठेवावी असे मला वाटते. लग्न सोहळा हा थाटामाटात साजरा करण्याची एक प्रकारची आपल्या समाजात जणूकाही चालरीतच पडून गेली होती. पण या लग्न पद्धतीमध्ये गरीब बापाचा जीव होरपळून निघत होता. याचे भानच समाजाला राहिले नव्हते. प्रत्येक बापाला वाटतं आपली मुलगी दिल्या घरी सुखाने नांदावी तिला कुठल्याही प्रकारचा सासुरवास नको त्यासाठी तो जमेल तश्या पद्धतीने कर्जबाजारी होऊन मोठया थाटामाटाने लग्न लावून देतो. मग ज्या घरामध्ये एकापेक्षा जास्त मुली असतात त्या बापाला तर ह्या सगळ्या गोष्टी करत असताना कधीकधी तर आपला जीव सुद्धा गमवावा लागतो.

आज कोरोनोसारख्या महामारीने तर गरीब श्रीमंत यांना एकच शिकवण दिली. आयुष्यभर काबाडकष्ट करून रक्ताचं पाणी करणारा बाप मुलीच्या लग्नासाठी फक्त एका दिवसात लाखोरुपयांचा खर्च करतो त्या खर्चाची काहीही गरज नसून अगदी मोजक्याच माणसांमध्ये आणि आपल्या एपतीनुसार सुद्धा लग्न होऊ शकते हे संपूर्ण जगाला दाखवून दिले. माणसाने नेहमी अंथरून पाहून पाय पसरावे. ही म्हण काही वावगी ठरणार नाही.

लग्नसोहळ्याना प्रचंड प्रमाणात खर्च करण्यापेक्षा तेच दोन पैसे मुलीच्या शिक्षणासाठी वापरा म्हणजे ती स्वतःच्या पायावर उभी राहील. किंवा तिच्या नावावर टाका म्हणजे भविष्यात तिला कधी गरज पडली तर त्याचा उपयोग ती करू शकेल. लग्न म्हणजे फक्त थाटामाटाचा सोहळा नसून दोन जीव, दोन घर, दोन गावे, दोन तालुके, दोन जिल्हे जोडणार नात आहे. त्या नात्याची किंमत पैशाचे सोंगडोंग घेऊन न करता जमेल तितक्या साध्या पद्धतीने करावी. सध्या जी लग्न पध्दत चालू आहे, अशीच पुढे कायमस्वरूपी चालू ठेवण्याचे काम आपले सर्वांचे, या संपूर्ण समाजाचे आहे, त्यामुळे हीच पद्धत पुढे चालू ठेवण्याचा सर्वांनी मिळून प्रयत्न केला पाहिजे.

शिल्पा नरवडे

माझं अस मत आहे की, काही जण लग्न हे खुप मोठ्या थाताट करतात मग त्या मध्ये लाखो करोड रुपरे खर्च करतात. पण काही जण लग्न आपल्या आयपती प्रमाणे करतात तर काही जण कर्ज करून आई वडिलांची एकच इच्छा असते की, आपल्या मुला- मुलीचे लग्न थाटात करावे. पण पैसा नसल्या कारणाने ते करू शकत नाही आणि ते कर्ज काढून लग्न करतात आयुष्यभर त्या कर्जाचे पैसे भरता भरता संपत नाही, आणि ह्या करोनाने तर आपल्याला माणूस म्हणुन कसे जगावे आहे ती संपत्ती कशी वापरवावे ह्याचे उत्तम उधारण दिले आहे.

काही जण लग्नामध्ये येतात आणि गरीब आई वडील हे आपल्या मुला-मुलींच्या लग्नासाठी आपल्या आयपती प्रमाणे लग्न करतात आणि काही मोठी माणस त्या लग्नामध्ये येऊन लग्न असेच झाले तसेच झाले हे बोलून दाखवतात हे ऐकून आई आणि वडिलांना वाईट वाटते आणि आता हे कमी लोकांमध्ये लग्न होणार हे चांगली गोष्ट आहे त्यामध्ये आपल्याच घरची लोक असणार त्यामुळे आता ह्या गोष्टी घडणार नाही हे मात्र खर, आणि आता पैसाची पण बचत होणार आणि बचत होणारा पैसा दुसऱ्या ठिकाणी वापरता सुद्धा येऊ शकतो.

महेश सोरटे

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News