बलात्काराच्या केसमध्ये पिडीतेला तात्काळ न्याय मिळावा का?

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 10 August 2020
  • आजची चर्चा, माझा आधिकार, माझे मत
  • बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्यात पीडीलेला लवकर न्याय मिळणे अपेक्षित आहे मात्र, असे होताना दिसत नाही.

मुंबई : कायदा हा गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी आणि पिडीतांना न्याय देण्यासाठी असतो. कायद्याची योग्य अंमलबजावणी होत नसल्यामुळे जनतेमध्ये असंतोषाचे वातावरण पसरले आहे. न्यायालयात केस दाखल केल्यानंतर निर्णय लागण्यास विलंब होतो. त्यामुळे न्याय व्यवस्थेवर असलेला जनतेचा विश्वास कमी होत चालला आहे. बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्यात पीडीलेला लवकर न्याय मिळणे अपेक्षित आहे मात्र, असे होताना दिसत नाही. 'बलात्कार करणाऱ्या नराधामांवर कडक करावाई करावी का? आणि त्या पडित महिलांना लवकरात लवकर न्याय मिळणे आवश्यक आहे का?' या विषयावर यिनबझच्या अनेक ग्रृपमध्ये आज मनोसोक्त चर्चा करण्यात आली. या चर्चेतील काही निवडक मत आणि प्रतिक्रिया येथे देत आहोत.

आपला देश आज एवढा पुढे गेला आहे पण, तरीही मुली घराबाहेर असुरक्षित असतात. का तर फक्त देश पुढं गेलाय माणसाची मनोवृत्ति तीच आहे. एखादी मुलगी एकटि दिसली की तिची छेड काढायची मनात येईल ते करायचं. प्रत्येक वेळी वेगवेगळ्या ठिकाणी मुलींवर बलात्कार. काही वेळा तर सगळ उघडकीस येऊ देत नाहीत,पैसे देऊन झाकुन टाकतात मग कुठे गेला हो त्या मुलींचा न्याय?  कशी मिळेल त्यांच्या आत्म्यास शांती? कशा नंतर त्या जगाला सामोरे जातील?  प्रत्येक वेळी नवीन आरोपी पण दोष कोणाला, मुलीला? का तर तिने आंगप्रदर्शन का केलं, तीच तशी होती, म्हणुन असं झालं , मग ती 7 वर्षाची चिमुरडी काय आंगप्रदर्शन करत असेल? बलात्कार झाल्यावर त्या मुलीला न्याय मिलावा म्हणुन मेनबत्तया जाळत बसून क़ाय होणार आहे, तय आरोपिला एवढी कड़क शिक्षा व्हावी की तो लवकर मरण याव म्हणुन प्रार्थना करेल. फाशी देऊन 8-10 मिनिट मधे ती शिक्षा नाही पूर्ण होऊ शकत. जस बलात्कार करुण मुलींना जाळतात ना तस अर्धवट जाळावं आरोपी ला, आणि उपचार देखील करु नये ..तेव्हा अश्या नाराधमांना भीती बसेल..पण अश्या शिक्षेला उत्तर मागायला Human Rights वाले येतील लगेच.. आसो एकटी मुलगी संधी नाही जबाबदारी समजा.
- पायल पुनाजी पोटभरे

भारतात नेहमी आपल्याला बलात्कार झाल्याची घटना ऐकण्यास येते. तसेच, याचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढत चालले आहे. या सर्व प्रकरणांचा दोष फक्त मुलींना दिला जातो. कुठे तरी हे सगळं थांबलं पाहिजे. काही मुलींना तर स्वतःच्या घरी सुद्धा सुरक्षितता वाटत नाही. म्हणून मुलांना स्त्रियांविषयी आदर करणे शिकवले पाहिजे. तसेच स्वतःचे विचार बदलणे हे अत्यंत गरजेचे आहे. मुळात या सर्व गोष्टींना गांभीर्याने घेतले पाहिजे. भारतात हजार पेक्षा जास्त सुरक्षित महिलांसाठी कायदे तयार केले आहेत. पण, तरीही काही वेळेला समोरच्यावर दबाव टाकून, पैसे देऊन केस दाबली जाते किंवा लपवली जाते. म्हणून जे अस कृत्य करणारे नराधम आहेत, त्यांना कठोरातील कठोर शिक्षा ही झालीच पाहिजे आणि त्या मुलीलाही न्याय लवकरात लवकर मिळालाच पाहिजे. 
- कोमल साळुंखे

बलात्कार करणाऱ्या नराधमांवर कडक कारवाई झालीच पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात बलात्कार करणाऱ्यास दिलेली शिक्षा म्हणजेच 'चौरंग' करणे तेव्हा तडफडन काय असत ते त्यांना समजत. पण सध्याच्या जगात अनेक बलात्काराच्या केस या पैसे देऊन दाबल्या जातात. त्यामुळे अशा नराधमांस आणखी वाव मिळतो. भारतात बलात्काराच्या केस अनेक वर्षोनुवर्षे कोर्टात चालू राहतात. त्यामुळे पीडित महिलेला न्याय मिळायला खूप उशीर होतो. आरोपी वरील गुन्हा सिद्ध करण्यास खूप वर्ष जातात आणि गुन्हा सिद्ध झाल्यावर त्या आरोपीस काही वर्षांसाठी जेल, दंड, जन्मठेप किंवा फाशीची शिक्षा होते. परंतु ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होई पर्यंत आणखी कितीतरी मुलींवर किंवा महिलांवर बलात्कार झालेले असतात. जर आरोपीवर लगेचच कडक कारवाई केली तर बलात्काराच्या घटना नक्की कमी होतील.
-श्रद्धा दिलीप ठोंबरे

बलात्कार हा आपल्या भारतातील सगळ्यात जास्त घडणारा गुन्हा आहे, असं आपण म्हणू शकतो. खरं तर जितक्या बलात्काराच्या तक्रारी नोंदवल्या जातात, त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त बलात्कार हे रोज घडत असतात. बलात्कार आणि मुलींवर होणाऱ्या शारीरिक अत्याचाराला, लैंगिक शोषणाला नेहमी मुलगीच जबाबदार असते, अशी आपल्या देशात मानसिकता आहे. तिने असे कपडे नको घालायला हवे होते, ती एवढ्या रात्रीच का उशिरा येते आणि बरंच काही... ती जर तिच्या career साठी उशिरापर्यंत बाहेर राहत असेल तर तिची लक्षण वाईट आहेत, आणि याच तुलनेत जर मुलगा रात्रभर घराबाहेर राहिला तर तो मात्र career oriented असा भेद पाहायला मिळतो. मुलीने असंच राहावं, असंच उठाव, असंच बसावं, असंच हसावं, या सगळ्या बंधनात तिला ठेवलं जातं, म्हणजे काय तर मुलीचं आयुष्य हे 'असंच' या शब्दाने बांधलं जातं. मुलांना स्त्रियांविषयी आदर करायला शिकवलं पाहिजे. मुली म्हणजे फक्त त्यांची शारीरिक भूक भागवण्याची गोष्ट नाही हे पटवून दिले पाहिजे. संविधानानुसार भारतीय दंड संहिता कलम ३७५ नुसार बलात्कार या गुन्ह्याविषयी तरतुदी केल्या आहेत. अजून मोठ्या प्रमाणात स्त्रियांच्या सुरक्षिततेसाठी कायदे तयार करण्यात यावे, इतकंच नव्हे तर मला असं वाटतंय की महिला सक्षमीकरण आणि सबलीकरणावर भर देण्यात यायला हवा. आपण जर स्वतःची सुरक्षा करू शकलो तरच त्यातून काहीतरी उत्पन्न होईल. मला इतकंच कळतं की जिवंत असताना जेव्हा तिला न्याय मिळेल ना तेव्हाच न्यायाला खरा अर्थ प्राप्त होईल, कारण काही मुली आत्महत्या करतात आणि नंतर त्यांना न्याय मिळतो. हो  तिला न्याय मिळणं चांगली गोष्ट आहे, पण तो न्याय बघायला जिच्यावर बलात्कार झाला आहे तीच नसेल तर काय अर्थ? कदाचित अजून कोणी ते कुकर्म करणार नाही पण बलात्कार हा फक्त बाहेरच किंवा अनोळखी व्यक्तीकडून होतो असं नाही, तो घरातही होतो, अगदी आपला जवळचा व्यक्तिसुद्धा बलात्कार करू शकतो. त्यामुळे बलात्कार करणाऱ्या हैवानाला कठोरतील कठोर शिक्षा आणि तिला योग्य त्या वेळी न्याय मिळावा!
-दिशा अनिता बापू

होय,बलात्कारी नराधमांना शिक्षा ही झालीच पाहिजे.ज्यावेळी एखाद्या स्त्रीवर बलात्कार होतो त्यावेळी ती भावनिक, शारीरिकदृष्ट्या उद्ध्वस्त झालेली असते. त्या प्रसंगाची पुन्हा आठवण तिला क्लेशदायक व भीतीदायक असते.बऱ्याचवेळेला पोलिस कशाला गुन्हा दाखल करता? तुमचीच अब्रू जाईल, असे सांगून गुन्हा नोंदविण्यास टाळाटाळ करतात. त्यामागील अंतर्गत हेतू, तपासाची जबाबदारी आपल्यावर येऊ नये अशी असते.बलात्काराच्या गुन्ह्यात स्त्रीला आरोपी माहीत असेल व तशी पहिल्या खबरेमध्ये नोंद केलेली असेल तर पोलिसांनी अशा आरोपीला पकडण्यासाठी त्वरित प्रयत्न करावेत. ज्यायोगे बळी पडलेली स्त्री व तिचे कुटुंबीय यांच्यामध्ये विश्वास निर्माण होईल.कायद्याची योग्यप्रकारे अंमलबजावणी होईल व स्त्रियांच्या बाबतीत होणाऱ्या गुन्ह्यांच्या प्रकरणात अपराध सिद्धी होईल याची निश्चिती शासनाने केली पाहिजे. असे जर शक्य झाले तर आणि तरच स्त्रीयांना न्याय मिळेल.
- साहिल चंद्रकांत बंडगर

ज्या देशात स्वातंत्र्य,समानता,न्याय संविधानिक पातळीवर जी मुल्य मानले जातात. त्या मुल्यांच्या जपवणुकीसाठी ह्या देशाचे कायदे केले जातात. तरीही निर्भया, कोपर्डी, खैरलांजी,तसेचं हैदराबाद यासारख्या घटना घडतात कायदा चालवणारे लोकच बरोबर नसतील तर कायद्याला दोष देऊन फायदा नाहीभारतात दर 15 ते 30 मिनटाला एक ह्या रेशोने बलात्काराची घटना समोर येते, यात किती गुन्हे दाखल होतात हा वेगळाच विषय. पण बलात्कार ची घटना जेव्हा घडते तेव्हा त्याचे तीन कारणं प्रामुख्याने दिसुन येतात ते म्हणजे १) पुरुषांमध्ये मानसिक दुर्बलता २) समाजिक अनास्था ३) व्यसन. पहिले तर पुरुषाची स्त्री कडे बघायची मानसिकता बदलने गरजेचे आहे. एक स्त्री ही फक्त उपभोग घेण्याची गोष्ट नाही याचे शिक्षण देणे गरजेचे आहे त्याची सुरवात शाळेतील लैंगिक  शिक्षण पासुन करावी लागेल पण आपल्याकडे  शिक्षणच निट नाही  तर लैंगिक शिक्षण दुरची गोष्ट.
      
दुसरा मुद्दा सामाजिक दबाव - असे गुन्हे करणार्या आरोपींवर समाजाने बहिष्कार टाकायला सुरवात केली तर कुठेतरी एक मानसिक दबाव असेल... तिसरा मुद्दा व्यसन - हा सत्तर ते ऐंशी टक्के गुन्हातील महत्वाचा भाग असतो मग ते निर्भया असो की प्रियंका आरोपी नशेत होते, भारतात नशेसाठी सहजतेने मिळणारे साधने आणी त्यात भेसळ असलेले डुप्लीकेट साधन गल्लोगल्ली वाहतायत व्यसन हे मानसाची मानसिकता विकृत करते नशेत माणसाला समोरची स्त्री ही फक्त एक उपभोग्य शिकार वाटते. चार बोटांच्या आणि पाच मिनीटांच्या खुशीसाठी कोणाचं आयुष्य खराब करणं म्हणजे एक निर्दयी निरर्थक कृत्य. केव्हा केव्हा तर निवडणूकीच्या वेळेस जो व्यक्ती आशे गुन्हे केला आहे किंवा त्यांच्या वर खुप सारे केस आहेत असे लोक निवडणूकीच्या वेळेस निवडून येतात तर व ते नगरसेवक,आमदार, खासदार,बनतात तेच व्यक्ती असे करतील तर ते लोकांना काय सुरक्षित ठेवतील...दुसरा महत्वाचा मुद्धा म्हणजे त्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे का ? तर हो प्रत्येकाला न्याय मिळालाच पाहिजे... आणि बलात्कारकरणाऱ्याला नराधामांना शिक्षा ही झालीच पाहिजे मग तो कोणी ही असो कायद्यासमोर सर्वच व्यक्ती समान आहेत पण असे होत नाही काही व्यक्ती हे प्रशानावरण दबाब टाकून ती केस तशीच दाबून पैसे देऊन बंद केली जाते...
-महेश नागनाथ सोरटे

बलात्कार करणाऱ्या त्या नराधामांना कडक शिक्षा झालीच पाहिजे. कारण की आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रीला देवी समान मानले जाते. स्त्रीच्या गर्भाशयातून संपूर्ण विश्वाची निर्मिती होते. आणि त्याच स्त्रीवर अत्याचार केला जातो ही किती निर्लल्जस्पद  बाब आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात स्रियांकडे वाकड्या नजरेने पाहिलं तर त्याची गय केली जात नव्हती. पण आजच्या काळात  स्त्री ला तर उपभोगाची वस्तू समजली जाते, तिला पुरुष तर स्वतःच्या हाताच खेळन,कटपुतली समजतो. आणि तिच्यावर मनात येईल तेव्हा, मग तो तिच्या वयाचा विचार सुद्धा करत नाही की ती कोणाची आई, बहीण, मुलगी असेल हे सुद्धा विसरून जातो. त्यामुळे अशा नराधमांना कठोरातली कठोर शिक्षा केली पाहिजे. मग तोच पुरुष काय इतर कोणताही पुरुष स्त्रीकडे वाकड्या नजरेनेच काय अशे विकृत कृत्य करताना शंभर वेळा विचार करेल. पीडित महिलेला न्याय हा मिळालाच पाहिजे. कारण सध्याच्या काळात 5 वर्षाच्या  चिमुरडी पासून ते वयोवृद्ध महिला पर्यत असे कृत्य केले जाते. मग यामध्ये या स्रियांची काही चूक नसतानाही त्यांना आपला जीव गमवावा लागतो. नुसते मोर्चे किंवा मेणबत्या पेटून त्या स्रियांना न्याय मिळत नाही. तर त्यासाठी त्या स्त्रीला जेवढ्या यातना झाल्या तेवढ्याच यातना त्या नराधमांना सुद्धा झाली पाहिजे. ती स्त्री जीवंत असतानाच तिच्या डोळ्यासमोर भर समाजामध्ये त्याला कठोर शिक्षा केली पाहिजे तेव्हाच तिला खऱ्या अर्थाने न्याय मिळालेला असेल. आजच्या 21 व्या शतकातील पुरुषांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शाची खरी गरज आहे. आजच्या स्रियांनी सुद्धा जिजाऊंच्या राणी लक्ष्मीबाईच्या लेकीं जन्माला येणे गरजेचे आहे.तेव्हाच कुठे तरी या विकृत कृत्याला आळा बसेल.
- शिल्पा नरवडे

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News