राज्यात प्रवासासाठी ई-पास असावा की नसावा ? वाचा तरूणाईच्या प्रतिक्रिया

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 26 August 2020

राज्यात प्रवासासाठी ई-पास असावा की नसावा ? वाचा तरूणाईच्या प्रतिक्रिया

राज्यात प्रवासासाठी ई-पास असावा की नसावा ? वाचा तरूणाईच्या प्रतिक्रिया

कोरोनाचा संसर्ग रोकण्यासाठी राज्यात ई-पास अत्यंत महत्त्वाचं काम केलं आहे. मागील ५ महिन्यांपासून ई-पासची सुविधा राज्य सरकारकडून चालवली जात आहे. या अनुंशागाने राज्यात प्रवासासाठी ई-पास असावा की नसावा ? या विषयावर आज 'यिनबझ'च्या अनेक ग्रुपमध्ये तरूणांनी मनसोक्त चर्चा केली. या चर्चेतील काही निवडक मते आणि प्रतिक्रिया आम्ही येथे देत आहोत.

कारण सध्या सगळीकडे कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. अशावेळी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लोकांच्या प्रवासावर निर्बंध आवश्यक आहेत. याकरिता सरकारने ई-पास ची योजना कार्यान्वित केली आहे. ही योजना बंद केल्यास लोक पुन्हा एकदा मुक्तपणे संचार करण्यास सुरुवात करतील ज्यामुळे कोरोना चा संसर्ग पुन्हा वाढेल. त्यामुळे ई-पास योजना चालु ठेवणे आवश्यक आहे.

- इश्वरी मुरूडकर

e-pass हा कोरोना हा संसर्गजन्य रोग आटोक्यात येण्यासाठी एक उपाय  शासनाने अवलंबला होता, पण याचा फायदा झाला आहे. पण त्याचे दुष्परिणाम ही आहेत e-pass सर्वांना सहजरित्या उपलब्ध होत नाही आवश्यक असणाऱ्यांना ते वेळेवर मिळत नाही.पण गैरमार्गाने मिळत आहे. e-pass नसतानाही अनेक लोक जिल्ह्यात अंतर्गत किंवा जिल्ह्याबाहेर प्रवास करत आहेत.

- निसार नायकवडी (फौजी)

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News