कसाही असला तरी, शाहरुख खानच्या या गोष्टी आदर्श पतींमध्ये असणे गरजेचे?

यिनबझ टीम
Friday, 6 March 2020

शाहरुख खान आणि गौरी खान या जोडीला बॉलीवूडचे आयडल कपल मानले जाते. पण हे मिळवण्यासाठी या दोघांनीही आपल्या नात्यावर खूप मेहनत घ्यावी लागली आहे. गौरीने करिअर आणि कुटुंबाची जबाबदारी हाताळताना शाहरुखनेही पती आणि वडील म्हणून आपल्या जबाबदाऱ्या पार पाडल्याचे दिसून येते.

शाहरुख खान आणि गौरी खान या जोडीला बॉलीवूडचे आयडल कपल मानले जाते. पण हे मिळवण्यासाठी या दोघांनीही आपल्या नात्यावर खूप मेहनत घ्यावी लागली आहे. गौरीने करिअर आणि कुटुंबाची जबाबदारी हाताळताना शाहरुखनेही पती आणि वडील म्हणून आपल्या जबाबदाऱ्या पार पाडल्याचे दिसून येते.

शाहरुख खान केवळ बॉलिवूडचा रोमान्स किंगच नाही तर त्याचे खरे रोमँटिक आयुष्यही यापेक्षा कमी नाही. 1991 मध्ये पहिल्याच नजरेत आवडणाऱ्या गौरीशी लग्न केले. त्यानंतर, त्यांचं करिअर सांभाळत त्या दोघांनीही आपल्या आयुष्याला चांगला आकार दिला. अशाच जोडप्यातील काही खास गोष्टी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, ज्या तुमच्या नात्याला घट्ट करू शकतील.

शाहरुख कधीच गौरीची पर्स चेक करत नाही...
शाहरुखने एका मुलाखतीत सांगितले होते की लग्नाला तीन दशकांहून अधिक कालावधी उलटून गेला. मात्र त्याने आपल्या पत्नीची पर्स कधीच तपासली नाही. किंग खानची ही गोष्ट सर्व पतींनी पाळली पाहिजे, असं त्याचं म्हणन आहे.

शाहरुख गैरीचा दरवाजा वाजवूनच रुममध्ये प्रवेश करतो
जेव्हा गौरी तयार होत असते, किंवा रुममध्ये एकटी असते, तेव्हा दरवाजा ठोठावल्यानंतरच शाहरुख खोलीत प्रवेश करतो. असं केल्याने आपण केवळ आपल्या पत्नीवरच प्रेम करत नाही तर त्यांचा आदरदेखील करतो हे यातून स्पष्ट होत असते.

आपल्यासोबत पत्नीच्या करिअरचीही काळजी घेणे
शाहरुख खानने फक्त आपल्या करिअरचा विचार केला नाही, तर आपल्या पत्नीच्या करिअरमध्येही सर्व प्रकारची साथ दिली. गौरीचे व्यक्तिमत्त्व, काम आणि तिने मिळवलेल्या करियरबद्दल शाहरुख नेहमी तिचे कौतुक करतो.

कुटुंबाला वेळ देणे
शाहरुख खान त्याच्या कारकीर्दीतील एक अभिनेता म्हणून सर्वदुर प्रसिध्द आहे. याचा अर्थ असा आहे की यासाठी खूप वेळ खर्च करणे, मेहनत घेणे, घरच्यांपासून दूर राहावे लागते, त्यातच मात्र शाहरुख खान आपल्या कुटुंबाला खूप प्रमाणिकपणे वेळ देत असतो.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News