बलात्कार करणाऱ्याला भर चौकात फाशी दिली जावी का?

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 8 August 2020
  • आजची चर्चा, माझा अधिकार, माझे मत...
  • बलात्काराचे प्रकरण दिवसेनदिवस वाढत चालले आहे.
  • त्या नरधमांना कसलीच भिती राहली नाही.
  • त्यासाठी कडक करावाई ही केलीच पाहिजे.

 

मुंबई :- बलात्काराचे प्रकरण दिवसेनदिवस वाढत चालले आहे. त्या नरधमांना कसलीच भिती राहली नाही. त्यासाठी कडक करावाई ही केलीच पाहिजे. आता सुध्दा कोरानाचे एवढे मोठे संकट संपूर्ण जगावर आले आहे. त्यात देखील कोविड सेंटरमध्ये सुध्दा बलात्कार सारखे वाईट कृत्य अनेक ठिकाणी झाले आहे. परंतु त्यावर कोणतीही कडक कारवाई झाली नसल्यामुळे त्यानंतर सुध्दा अशी प्रकरण घडत गेले आहे. अशा या नरधमांना शिक्षा ही झालीच पाहिजे. स्त्री ही त्यांच्या उपभोगाची वस्तू नाही हे त्यांना समजले पाहिजे. बलात्कार करणाऱ्याला भर चौकात फाशी दिली जावी अशी लोकांमधून अनेक वेळा मागणी होते? तुम्ही या मागणीकडे कसे पाहता?... याच विषयावर यिनबझच्या अनेक ग्रृपवर मनोसत्त्क चर्चा केली. या चर्चेतील काही निवडक मत आणि प्रतिक्रिया येथे देत आहोत.

मला वाटत नाही की,  बलात्कार करणाऱ्या त्या नराधमाला फाशी द्यावी, कारण फाशी दिल्याने त्यांचा एका फटक्यात जीव जाईल. त्या नरधमाचा जीव हा एका फटक्यात गेल्याने त्यांना काही वाटणार नाही आणि ही शिक्षा पाहून बाकी नरधमाना कसली भिती वाटणार नाही. त्यासाठी मला वाटते की, त्या पीडित महिलेनी ज्या यातना सहन केल्या आहेत, म्हणजेच त्यांचा जीव तेव्हा किती तडफडला असेल. तसेच या नरधमांना देखील तडफडत राहण्याची शिक्षा करावी म्हणजे बाकी, लोकांना पण समजेल की, बलात्कार केला की,  जिवंत पणी मरण यातना कशा भोगाव्या लागत ते असे केले तरच बलात्कारची भिती राहिली. म्हणजे मला वाटते की, त्यांना एकच शिक्षा द्यावी ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जी शिक्षा केली जात होती, ती म्हणजे त्या नराधमांना चौरंग करणे. आताच्या कळात ही शिक्षा केली तरच बलात्कार करणाऱ्या नरधमांच्या मनात भिती राहू शकले. म्हणजे पुन्हा असे धाडस करतात ना त्यांना या शिक्षेची आठवण येईल. बलात्कार शब्द जरी त्यांनी एकला तर ते सळासळा कापले पाहिजेत. म्हणून हीच शिक्षा त्याच्यासाठी योग्य आहे, असे माझे व्यक्तिक मत आहे.

रसिका जाधव

असे कृत्य करणाऱ्याला शिक्षा ही नक्कीच झाली पाहिजे. पण होणारी शिक्षा ही त्या व्यक्तीला असेल, त्याच्यामधल्या विकृतीला शिक्षा कोण देणार ??  हे सगळ्यात महत्वाचे आहे. त्यासाठी प्रत्येकामध्ये लहानपणापासूनच स्त्रीबद्दल आदर करण्याचे संस्कार देणे गरजेचे आहे. जमलंच तर मग शैक्षणिक अभ्यासक्रमात याविषयी एक धडा तर नक्कीच असावा. त्याचबरोबर न्यायव्यवस्थेने आशा नराधमांना कठोर शिक्षा दिली पाहिजे. जेणेकरून असे कृत्य करणाऱ्यांच्या मनात न्यायव्यवस्थेबद्दल भीती निर्माण होईल.

नागेंद्र स्वामी

जर आपल्याना शिक्षेविषयी बोलायचं असेल तर सर्वप्रथम गुन्हा म्हणजे काय ? हे समजून घ्यावे लागेल. ऑरिस्टॉल  म्हणतो, माणूस हा जन्मतःच गुन्हेगार असतो. गुन्हा करणे हे मानवी स्वभावच आहे. ज्याला आपण सत्ययुग म्हणतो त्या काळात सुद्धा गुन्हे होतच होते मग तो रामायणचा काळ असो की, बुद्धाचा गुन्हे हे युगा-युगा पासून घडत आहेत.

शिक्षेमुळे गुन्हे होणे बंद होतात ? तर नाही. जगात काही असे देश आहेत जर चोरी केली तर हात कापतात,  स्त्री ने व्यभिचार केला तर सामूहिक पणे तिला दगडाने ठेचून मारतात,  जर कोणी बलात्कार केला तर त्याचे गुप्त अंग कापतात. नेठेर्लंड या देशाने तर असा कायदा केला की जर कोणी बलात्कार केला तर त्याचे गुप्त अंग कापायचे आणि त्याच्यात मुलीचे हार्मोन्स सोडायचे. इतक्या भयंकर शिक्षा असल्याने त्या देशात गुन्हे घडत नाही का?  त्या देशात सुद्धा गुन्हे घडतातच.

शिक्षेमुळे गुन्हेगारी कमी होते ती संपत नाही. भर चौकात फाशी देणे ह्या मुळे अबाल बालक आणि तरुण यांच्या मनावर काय परिणाम होणार त्यांच्यात हिंसेच्या भावनेचे विष पेरण्या सारखे होईल. लोकांच्या मनात हिंसेची भावना निर्माण करणे म्हणजे एकप्रकारे सामूहिक गुन्हेगारीला आमंत्रण दिल्या सारखे आहे. लायन्चिग हा शिक्षेचा प्रकार ह्याच हिंसेच्या भावनेतून जन्म घेतला आहे. दगडाने ठेचून मारणे, हात-पाय तोडणे,  भर चौकात फाशी देणे,  या शिक्षा जगाच्या पाठीवर अमानुष ठरल्या आहेत.

आता फक्त्त रिफॉर्मटिव्ह अँप्रोच पुढे आला आहे की, गुन्हेगाराला सुधारा, समाजात अहीं सेचे मूल्ये पेरा. महात्मा गांधी म्हणतात hate the sin not the sinner. लहान मुलाला चांगली शिकवण देऊन आपण एका चांगल्या समाजाची निर्मिती करू शकतो, आणि शिक्षेने गुन्हेगारी फक्त्त कमी करू शकतो तिला संपवणे अशक्य आहे.

सचिन दरवंडे

बलात्कार करणाऱ्याला भर चौकात फाशी नाही,  तर त्याचा भरचौकात चौरंगा केला पाहिजे. कारण फाशीच्या शिक्षेने त्याचा जीव लगेच जाईल,  आणि चौरंगा केला तर समाजातील प्रत्येक व्यक्तीच्या मनात एक भीती निर्माण होईल. त्यामुळे त्याचा स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन आदर वाढेल. पुरुष हा स्त्रीला फक्त उपभोगाची वस्तू समजतो. काही तरुण मूल तर मुलीवर प्रेम करतात आणि जर ती मुलगी आपली नाही,  झाली तर दुसऱ्याची कोणाचीच झाली नाही पाहिजे. या विकृत विचारानेच आज मुलींवर अत्याचार केला जातो, आणि मग आम्ही याला खर प्रेम म्हणायचं का? त्यामुळे अशा मुलांना तर त्यांच्या विकृत कृत्याची शिक्षा ही तळपुन तळपुन दिली पाहिजे. याचे कारण असे की, मग या पुढे समाजातील कोणताच पुरुष बलात्कार तर सोडाच पण स्त्रीकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत सुद्धा करणार नाही.

आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रीला देवी समान मानले जाते. प्रत्येक पुरुष हा स्त्रीच्या गर्भातूनच जन्माला आलेला असतो. प्रत्येकालाच आई, बहीण, बायको मुलगी हवी असते. प्रत्येकाला स्त्रीच्या गर्भात जन्म घ्यायला आवडतो. मग तिच्यावर असे विकृत कृत्य करताना या नराधमांना लाज कशी वाटत नाही.  त्यामुळे मला तर वाटते आज प्रत्येक स्त्रीने स्वतः सक्षम झाले पाहिजे. स्त्रीयांनी हातात बांगड्या जरूर घालाव्यात पण त्या बंगड्यांचा आवाज सुद्धा तिला करता आला पाहिजे. कराटे तलवारबाजी, दांडपट्टा या सारखे शिक्षण घेणे आज काळाची गरज आहे, बाहेर फिरताना नेहमी आपल्याजवळ  स्वतःला वाचवण्यासाठी लाल मिरची,  खंनजीर या वस्तू जरूर बाळगव्यात. म्हणजे या नराधमांना आहे त्याच जागेवर शिक्षा देता येईल.

स्त्रीने समाजामध्ये चालताना नेहमी ताठ मानेने आणि घट्ट कासुटयाने चालले पाहिजे. आपल्या समाजात पुरुषप्रधान संस्कृती असल्यामुळे नेहमीच स्त्रीयांनाच दोषी ठरवले जाते. त्यामुळे गुन्हा करणारा गन्हेगार असतोच, पण सहन करणारा तितकाच गन्हेगार असतो. झाशीची राणी लक्ष्मीबाई, राजमाता जिजाऊ यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून स्त्रीयांनी जगले पाहिजे. तसेच प्रत्येक घरातील मुलांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शाची खरी गरज आहे. त्यामुळे स्त्रीयांनी नेहमी हे लक्षात ठेवले पाहिजे की, दुनिया झुकती है लेकिन झुकनेवाला चाहीहे।।

शिल्पा नरवडे

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News