या कारणामुळे जगात दरवर्षी टाळेबंदी करावी: युवा टेनिसपटू स्टीफनोस सिटिसपास

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 23 May 2020

वर्षामध्ये एकदा लॉकडाऊनमध्ये रहायला हवे. हे आपल्या जीवनासह पृथ्वीसाठीसुद्धा चांगले ठरले," मला खरोखर हे समजले आहे की लॉकडऊन पर्यावरणासाठी फायदेशीर आहे, असे सिटिसपास म्हणाला.

अथेन्स : कोरोना विषाणूमुळे जवळपास संपूर्ण जगात लॉकडाऊनमध्ये जारी करण्यात आला. शिवाय जागतिक स्तरावरील व्यवहार स्थगित झाले. परिणामी अशी परिस्थिती निसर्गासाठी अनुकूल ठरत आहे, असे मत ग्रीसचा युवा टेनिसपटू स्टीफनोस सिटिसपास याने इंस्टाग्राम या सोशल माध्यमावर व्यक्त केले आहे.

"लॉकडाऊनमधील आयुष्य खूप वेगळंच आहे. आपण थांबलो आहोत. आपल्याला वर्षातून एकदा लॉकडाऊनमध्ये राहिलो तर ते निसर्गासाठी चांगले असेल. सध्या मी खेळाच्या दौऱ्यावर नसून कुटुंबासमवेत वेळ घालवतोय," असे सिटिसपास म्हणाला. यापुढे मला वाटते की वर्षामध्ये एकदा लॉकडाऊनमध्ये रहायला हवे. हे आपल्या जीवनासह पृथ्वीसाठीसुद्धा चांगले ठरले," मला खरोखर हे समजले आहे की लॉकडऊन पर्यावरणासाठी फायदेशीर आहे, असे सिटिसपास म्हणाला.

"जीवन फार धावपळीचे झाले आहे, जिथे आपल्याला आपल्या कुटुंबासमवेत राहण्यास आणि त्यांच्याशी संपर्क साधण्यास कधीही वेळ मिळत नाही. आता अशी संधी मिळाल्याने आपले कौटुंबिक आरोग्य तंदरुस्त राहण्यास मदत होईल, असे सिटिसपासने सांगितले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News