‘शोना...’ची ऐतिहासिक सफर

यिनबझ ऑनलाईन टीम
Monday, 11 February 2019

सध्या संपूर्ण तरुणवर्ग ‘व्हॅलेन्टाईन डे’च्या प्रतीक्षेत असताना ‘व्हॉट्‌सॲप लव’ चित्रपट प्रेक्षकांसाठी एक खास भेट घेऊन आला आहे. या चित्रपटातील ‘शोना रे’ गाणं नुकतंच प्रदर्शित झालं आहे.

   हे रोमॅण्टीक गाणं गायक जावेद अलीने गायलं आहे. व्हॅलेन्टाईन डेच्या ऐन मोक्‍यावर प्रदर्शित करण्यात आलेल्या या गाण्यातून प्रेक्षकांना ऐतिहासिक सफर घडणार आहे.

राणी रूपमती आणि राजे बाजबहाद्दूर यांच्या प्रेमकहाणीची साक्ष देणाऱ्या मध्य प्रदेशातील मांडूगडावर चित्रीकरण केलं आहे. ‘शोना रे’ गाणं राकेश बापट आणि इराणी अभिनेत्री सारेह फर यांच्यावर चित्रित केलं आहे. हे गाणं चित्रपटाचं खास आकर्षण ठरणार आहे.

मांडूगडावर आजवर एकाही मराठी चित्रपटाचे चित्रीकरण झाले नाही. हेमंत कुमार निर्मित दिग्दर्शित हा चित्रपट ५ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News