धक्कादायक! अंमली पदार्थ प्रकरणी रियाने दिली २५ जणांची माहिती; दिग्गज कलाकार, निर्माते, डिझायनरचा समावेश

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 12 September 2020

अंमली पदार्थ प्रकरणी प्रसिद्ध कलाकार सारा आली खान, अभिनेत्री कुलप्रीत सिंह आणि डिझायनर सिमोन खांबाटा याचे नाव घेतले, तसेच दिग्गज निर्माते, कलाकार, फॅशन डिझायनर असे एकुण २५ जणांचा यात समावेश असल्याची कबुली दिली.

मुंबई : सुशांत सिंग राजपूत प्रकरणाने आता वेगळे वळण घेतले आहे, या प्रकरणाची प्रमुख साक्षीदार रिया चक्रवर्तीने अंमली पदार्थ प्रकरणी प्रसिद्ध कलाकार सारा आली खान, अभिनेत्री कुलप्रीत सिंह आणि डिझायनर सिमोन खांबाटा याचे नाव घेतले, तसेच दिग्गज निर्माते, कलाकार, फॅशन डिझायनर असे एकुण २५ जणांचा यात समावेश असल्याची कबुली दिली. आत या प्रकरणात कोणते मासे गळाला लागणार याची धाकधूक बॉलिवूड करांना लागली आहे.

एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, रियाने आपला २० पानी जवाब एनसीबीकडे नोंदवला. त्यात अनेक धक्कादायक माहिती सांगितले, या संपूर्ण प्रकरणाची एसीबी कसून चौकशी करणार आहे. रियाने दिलेली २५ लोकांनी माहिती एकत्र करुन 'ए' 'बी' 'सी' अशा तीन याद्या तयार केल्या जाणार आहेत. त्याची पहिली यादी लवकरत प्रसिद्ध केली जाईल असे एसीबीने सांगीतले. प्रत्येकाची व्यक्तीची कसून चौकशी करणार असल्याचे एसीबीने म्हणाले. 

रियाने फिरवला जबाब

मुंबई सत्र न्यायालयात रिया चक्रवर्तीला हजर करण्यात आले. यावेळी रियाने आपला जबाब फिरवला. एसीपीने माझ्यावर दबाव टाकून खोटी कबुली नोंदवली असं रियाने कोर्टाला सांगितले. त्यामुळे एसीबीला मोठा धक्का बसला. रियाचा जामीन कोर्टांनी मंजूर करावा अशी विनंती रियाच्या वकीलाने केली, मात्र कोर्टाने रियाचा जामीन नामंजूर केला, त्यामुळे अभिनेत्री रिया चर्कवर्ती, रियाचा भाऊ शौविक चक्रवर्ती, अब्दुल बासीत परिहार, झैद विलात्रा, दीपेश सावंत, सॅम्युअल मिरांडा यांना आणखीन काही दिवस पोलिस कोठडीत राहावे लागणार आहे. या प्रकरणी उच्च न्यायालयात दात मागणार असल्याचे रियाच्या वकीलांनी सांगितले.
 
रियाने ज्या २५ जणांचे नाव घेतले आहे त्यातील डिझायरनर सिमोन खांबाटाचे व्हँट्सअँप चॅट एससीबीला सापडली. या व्हँट्सअँप चॅटींगमध्ये अंमली पदार्थाची माहिती आहे. तसेच काही जणांनी नावे आहेत. त्यामुळे तपासाचा पहिला धागा कोणाच्या गळ्यात आडकणार काही दिवसात स्पष्ट होईल. रिया आली खान सुशांत सोबत बॅंकॉक ट्रिपवर गेली होती, दोघे एकाच हॉटेल मध्ये थांबले होत. यावेळी काय घडले असावे याची चौकशी एससीबी करत आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News