Related News
मुंबई : कोविड- १९ विषाणूचा प्रादुर्भावर रोखण्यासाठी मिरा भाईंदर महानगरपालिकेची मोघा...
मिरा भाईंदर :- कोविड-१९ चा प्रादुर्भाव वाढत गेला आणि त्यासाठी मग सगळीकडे लॉक़डाऊन करण्यात आले होते. परंतु या लॉकडाऊनमध्ये पण अनेक गुन्ह्यांच्या धक्कादाय्यक घटना समोर आल्या आहेत. अशातच मुंबईत बलात्काराचा एक धक्कादाय्यक प्रकार समोर आला आहे. वडिलांनीच आपल्या ९ वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला आहे. भाईंदरमधील उत्तन इथेच हा भयंकर प्रकार घडला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
एका ३५ वर्षीय नराधम बापानेच आपल्या पोटच्या ९ वर्षीय मुलीचे लैंगिक शोषण केले आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी बापाला अटक केली असून पुढील चौकशी सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी बापने पत्नी कामावर गेली असताना मुलीवर अत्याचार केले.
खरंतर, कोरोनामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आणि घरी राहण्याची वेळ आली. यावेळी आरोपी पती घरीच असायचा तर पत्नीला कामाला जायची. याच संधीचा फायदा घेत आरोपी पिता रोज मुलीचे लैंगिक शोषण करायचा. पण भीतीपोटी मुलीने कोणाला काही सांगितले नसल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. पण गेल्या आठवड्यात पीडित मुलगी शेजाऱ्यांकडे गेली असता त्यांनी तू शांत का आहेस असा प्रश्न विचारला असता पीडितेने रडत रडत संपूर्ण प्रकार सांगितला.
शेजाऱ्यांनी तात्काळ या घटनेची माहिती पोलिसांना दिली आणि आरोपी बापाविरोधात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी आरोपीविरोधात पोस्कोअंतर्गत गुन्हा दाखल केला असून गुरुवारी ठाणे जिल्हा सत्र न्यायालयात आरोपीला हजर केले असता न्यायालयाने ०३ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.