स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी साताऱ्यात धक्कादायक घटना; पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला  

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 15 August 2020
  • आज १५ ऑगस्ट संपूर्ण देशात साजरा केला जातो.
  • आज ७४ वा स्वातंत्र्य दिन देशभरात उत्साहत साजरा केला आहे. परंतु, साताऱ्यात स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी धक्कादाय्यक घटना घडली आहे.

आज १५ ऑगस्ट संपूर्ण देशात साजरा केला जातो. आज ७४ वा स्वातंत्र्य दिन देशभरात उत्साहत साजरा केला आहे. परंतु, साताऱ्यात स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी धक्कादाय्यक घटना घडली आहे. एका कुटुंबाने न्याय मागण्यासाठी अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी वेळीच धाव घेतल्यामुळे मोठा अनर्थ टळला.

दत्तात्रय महाराज कळंबे जावळी सहकारी बँकेतील अधिकाऱ्यांनी नलावडे कुटुंबियांची ४१ लाख रुपयांची फसवणूक केली, असल्याचा आरोप करत कुटुंबियांनी न्यायासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची घटना घडली. यावेळी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त होता. पण, आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या एका महिलेस रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

विशाल नलावडे, ज्योती नलावडे आणि राहुल नलावडे अशी नावे फसवणूक झालेल्या व्यक्तींची आहेत. दत्तात्रय महाराज कळंबे जावळी सहकारी बँकेतील अधिकाऱ्यांनी आणि संचालकांनी ४१ लाखांची फसवणूक केली असल्याचा आरोप नलावडे कुटुंबिंयानी केला आहे. फसवणूक झाल्याप्रकरणी या कुटुंबियांनी स्वातंत्र्यदिनी आत्मदहनाचा इशारा दिला होता. आज स्वातंत्र्यदिनी या नलावडे कुटुंबियांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला. यावेळी ज्योती नलावडे यांची प्रकृती खालावल्याने त्यांना उपचारास जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

 

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News