पुण्यातील धक्कादायक घटना, मावशीनेच भाचीला दाखवले पॉर्न व्हिडिओ !

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 11 August 2020
  • विद्येचे माहेर घर म्हणून पुण्याची ओळख आहे.
  • एवढेच नव्हे तर, महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळख असलेल्या पुण्यात नात्याला काळीमा फासणारी लज्जास्पद घटना घडली आहे.
  • स्वत:च्या बहिणीच्याच मुलीला तिच्या प्रियकराच्या मदतीने जबरदस्तीने पोर्न व्हिडिओ दाखवल्याप्रकरणी एका मावशीला अटक करण्यात आली आहे.

पुणे :- विद्येचे माहेर घर म्हणून पुण्याची ओळख आहे. एवढेच नव्हे तर, महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळख असलेल्या पुण्यात नात्याला काळीमा फासणारी लज्जास्पद घटना घडली आहे. स्वत:च्या बहिणीच्याच मुलीला तिच्या प्रियकराच्या मदतीने जबरदस्तीने पोर्न व्हिडिओ दाखवल्याप्रकरणी एका मावशीला अटक करण्यात आली आहे. आरोपी महिलेच्या प्रियकरालाही अटक करण्यात आली आहे. लॉकडाउनच्या काळात पुण्यातील कोंढवा परिसरात ही घटना घडली. एप्रिल महिन्यात लॉकडाउन लागू झाल्यामुळे पीडित अल्पवयीन मुलीला तिच्या आईने आपल्या बहिणीकडे राहण्यासाठी सोडले होते. या काळात आरोपी महिलेने आपल्या बहिणीच्या मुलीलाच जबरदस्तीने पोर्न व्हिडिओ दाखवले होते.

आपल्या घरी परतल्यानंतर पीडित मुलीने सगळी हकीकत आपल्या आईला सांगितली. आपल्याच बहिणीने असा प्रकार केल्यामुळे तिला जबर धक्का बसला. त्यानंतर पीडित मुलीला घेऊन या महिलेने  पोलीस स्टेशन गाठले आणि तक्रार दाखल केली. पोलिसांनी पोक्सो कायद्याअंतर्गत बहिणीच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून दोघांनाही अटक केली आहे.

लॉकडाउनच्या काळात पीडित मुलीला जेव्हा बहिणीच्या घरी सोडले होते. तेव्हा आरोपी महिलेचा प्रियकर हा घरी ये जा करत होता. दोघांनी या पीडित मुलीला जबरदस्ती करत पोर्न व्हिडिओ दाखवले. आधीच लॉकडाउन असल्यामुळे बाहेर पडायचे आणि कुणाला काय सांगायचे असा प्रश्न पीडितेला पडला होता. त्यामुळे आरोपी मावशी आणि तिच्या प्रियकराने तिच्यावर सतत अत्याचार केले. काही दिवस त्यांचा हा अत्याचार सहन केल्यानंतर पीडित मुलगी आपल्या घरी परतली तेव्हा सगळा प्रकार आईला सांगितला.

पोलिसांनी अटक केल्यानंतर आरोपी महिला आणि तिच्या प्रियकराला पोलिसांनी खाक्या दाखवताच गुन्हा कबूल केला. अटक केल्यानंतर खबरदारी म्हणून पोलिसांनी या दोघांची कोरोनाचा चाचणी केली असता दोघांचेही रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहे. कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे दोघांना कारागृहात पाठवता आले नाही. या दोघांना सध्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दोघांचेही रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर दोघांचीही रवानगी तरुंगात करण्यात येणार आहे. बहिणीचे आपल्या मुलीसोबत अत्यंत खालच्या पातळीचे वर्तन केल्यामुळे पीडितेच्या कुटु्ंबीयांमध्ये तीव्र संताप आहे. नातेवाईकांनीही मावशीच्या या काळ्या कृत्यावर तीव्र संताप व्यक्त केला असून कडक शिक्षा द्यावी, अशी मागणी पोलिसांकडे केली आहे.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News