धक्कादाय्यक! रियाच्या अंडरवर्ल्ड कनेक्शनबद्दल छोटा शकीलचा खुलासा, म्हणाला...

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 29 August 2020
  • बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास आता सीबीआय करते आहे, तर या प्रकरणाबाबतीत दररोज नवनविन प्रकरणे समोर येत आहेत.
  • सुशांतच्या आत्महत्येमुळे बॉलिवूडमधली काही धक्कादाय्यक गोष्टी समोर आल्या आहेत.

मुंबई :- बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास आता सीबीआय करते आहे, तर या प्रकरणाबाबतीत दररोज नवनविन प्रकरणे समोर येत आहेत. सुशांतच्या आत्महत्येमुळे बॉलिवूडमधली काही धक्कादाय्यक गोष्टी समोर आल्या आहेत. सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीचे अंडरवर्ल्ड कनेक्शन आणि ड्रग्ज माफियांबरोबर लिंक असण्याच्या बातम्या देखील समोर आल्या आहेत.

सूत्रांच्या माहिती नुसार, छोटा शकीलने एकीकडे रिया चक्रवर्तीचे अंडरवर्ल्ड कनेक्शन असल्याचे वृत्त फेटाळले आहे, तर दुसरीकडे त्याने बॉलिवूडवर अंडरवर्ल्डची पकड असल्याचे म्हटले आहे. छोटा शकीलने बॉलिवूड चित्रपटांमध्ये आम्ही पैसे पुरवत असल्याचा खुलासा केला आहे.

 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Still struggling to face my emotions.. an irreparable numbness in my heart . You are the one who made me believe in love, the power of it . You taught me how a simple mathematical equation can decipher the meaning of life and I promise you that I learnt from you every day. I will never come to terms with you not being here anymore. I know you’re in a much more peaceful place now. The moon, the stars, the galaxies would’ve welcomed “the greatest physicist “with open arms . Full of empathy and joy, you could lighten up a shooting star - now, you are one . I will wait for you my shooting star and make a wish to bring you back to me. You were everything a beautiful person could be, the greatest wonder that the world has seen . My words are incapable of expressing the love we have and I guess you truly meant it when you said it is beyond both of us. You loved everything with an open heart, and now you’ve shown me that our love is indeed exponential. Be in peace Sushi. 30 days of losing you but a lifetime of loving you.... Eternally connected To infinity and beyond

A post shared by Rhea Chakraborty (@rhea_chakraborty) on

सुशांत आत्महत्या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या सीबीआय टीमला रिया चक्रवर्तीच्या अंडरवर्ल्ड कनेक्शनबाबत काही पुरावे हाती लागले असल्याचे बोलले जात आहे. सुशांतच्या मृत्यू प्रकरणात अंडरवर्ल्डच्या एंट्रीने सर्वांना मोठा धक्का बसला आहे. एका मुलाखतीत छोटा डॉन शकीलने असे म्हटले आहे की, सीबीआय त्यांचा तपास करत आहे. याप्रकरणी सीबीआयने अनेकांची चौकशी केली आहे आणि लवकरच सत्य सर्वांसमोर येईल.

 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Felt cute , might delete later #rheality Shot by @gauravsawn

A post shared by Rhea Chakraborty (@rhea_chakraborty) on

छोटा शकीलने याप्रकरणी गौरव आर्याशी ओळख असण्यासही नकार दिला आहे. छोटा शकीलच्या मते त्याने हे नाव पहिल्यांदा ऐकले आहे. छोटा शकीलने असे म्हटले आहे की, ही सर्व कहाणी रचण्यात आली आहे की गौरवचे अंडरवर्ल्ड कनेक्शन आहे. आमचे गौरवशी काही घेणे देणे नाही आहे. आम्ही रिया चक्रवर्तीला देखील ओळखत नाही. आमचे तिच्याशी काही कनेक्शन नाही.

छोटा शकील म्हणाला की, बॉलिवूडमध्ये काहीही झाले तरी त्यामध्ये अंडरवर्ल्डचे नाव जोडले जाते. सीबीआय या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करत आहे आणि लवकरच संपूर्ण सत्य सर्वांसमोर येईल. याप्रकरणी मुंबई पोलीस आणि बाकी एजन्सी काय करत आहेत. जे कुणी लोक अंडरवर्ल्डबरोबर रियाचे कनेक्शन असल्याच्या गोष्टी करत आहेत, ते खोटे बोलत आहेत. जे कुणी असा दावा करत आहे त्याने स्वत:च्या मुलांची शपथ घेऊन बोलावे की रियाशी आमचे कनेक्शन आहे. सीबीआय चौकशी आधी एखाद्याला शिक्षा सुनावणे चुकीचे आहे. छोटा शकील म्हणाला की, आज देखील बॉलिवूडवर अंडरवर्ल्डची पकड आहे. आम्ही बॉलिवूडमध्ये चित्रपट बनवणाऱ्यांना आजही पैसे पुरवतो.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News