धक्कादायक.. ! इंग्रजीत बोलली म्हणून तरुणाने चक्क 'ती'चा मेंदू खाल्ला 

सकाळ वृत्तसेवा-यिनबझ
Saturday, 7 December 2019

'नशेत रस्त्याच्या बाजूला पडलो होतो. शिवाय, प्रचंड भूकही लागली होती. यावेळी एक अज्ञात महिला आली व तिने इंग्रजीमध्ये संवाद साधण्याचा प्रयत्न केला. 

न्यूयॉर्क : महिलांवरील अत्याचाराच्या घटना देशात होत असताना एका किळसवाणा प्रकार समोर आला आहे. दारूच्या नशेत एका तरुणाने चक्क महिलेचा मेंदू खाल्ला आहे. 

दारू पिऊन तो नषेत पडला होता. एक महिला त्याच्याजवळ आली आणि त्याच्याशी इंग्रजीमध्ये संवाद साधला. पण, त्याला इंग्रजी न कळाल्यामुळे व भूक लागल्यामुळे त्याने महिलेचा खून केला आणि तिचा मेंदू काढून खाल्ला. फिलीपिन्समध्ये ही घटना घडली असून, पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

लॉयड बॅगटाँग (वय 21) असे अटक केलेल्या विकृताचे नाव आहे. पोलिसांनी त्याला गुरुवारी (ता. 5) अटक केली. बॅगटाँगने तपासादरम्यान पोलिसांना सांगितले की, 'नशेत रस्त्याच्या बाजूला पडलो होतो. शिवाय, प्रचंड भूकही लागली होती. यावेळी एक अज्ञात महिला आली व तिने इंग्रजीमध्ये संवाद साधण्याचा प्रयत्न केला. पण, मला इंग्रजी येत नसल्यामुळे तिचा राग आला. तिचा खून केला व डोकं धडापासून वेगळे केले आणि मेंदू काढून खाल्ला.'

पोलिस अधिकारी मारिबेथ रामोगा यांनी सांगितले की, 'तरूणाच्या घरापासून काही अंतरावर महिलेचे अवयव सापडले आहेत. महिलेचा मृतदेह सापडला तेव्हा तिच्या अंगावर केवळ जीन्स होती. तिचे हात बांधलेले होते. बॅगटाँगला अटक करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.'

प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, घटना घडण्यापूर्वी महिला चालत जाताना पाहिली होती. बॅगटाँग हा बेरोजगार आहे. नशेत असताना त्याने महिलेचा खून केला. नंतर मोठ्या चाकूने तिचं डोकं धडापासून वेगळं केले आणि एका कापडात गुंडाळून घरी घेऊन गेला. भात तयार केला आणि महिलेचा मेंदू त्यावर ठेवून खाल्ला. नंतर घराजवळील एका खड्ड्यात महिलेचे डोके फेकून दिले.'

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News