तुकाराम मुंढे यांचे धक्कादायक आरोप; पाहा काय म्हणाले

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 28 August 2020
  • तुकाराम मुंढे हे नेहमीच त्यांच्या कामांमुळे लोकांच्या चर्चेत राहले आहेत.
  • एवढेच नव्हे तर त्यांच्या सतत होणाऱ्या बदलीमुळे देखील ते चर्चेत आहेत.
  • राज्यातील आयएएस अधिकाऱ्यांच्या बदली करण्यात आल्या आहेत.

मुंबई :- तुकाराम मुंढे हे नेहमीच त्यांच्या कामांमुळे लोकांच्या चर्चेत राहले आहेत. एवढेच नव्हे तर त्यांच्या सतत होणाऱ्या बदलीमुळे देखील ते चर्चेत आहेत. राज्यातील आयएएस अधिकाऱ्यांच्या बदली करण्यात आल्या आहेत. त्यात नागपूर महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांचाही समावेश आहे. तुकाराम मुंढे यांची महाराष्ट्र जीवन प्राधिकरण इथे सचिवपदी बदली करण्यात आली आहे. पण, ही काही त्यांची पहिली बदली नाही आहे. त्यांच्या चोख कामांमुळे आणि तत्त्वांमुळे ते कायमच चर्चेत राहिले आहेत. यावेळी झालेल्या बदलीनंतर एका वृत्तपत्राने घेतलेल्या मुलाखतीमध्ये तुकाराम मुंढे यांनी खळबळजनक आरोप केले आहेत.

गेल्या काही वर्षात मी माझा आक्रमकपण कमी केला. माझ्या स्वभावाला मुरड घातली पण यापुढे माझ्या कितीही बदल्या झाल्या तरी मी माझ्या तत्त्वांशी तडजोड करणार नाही असे ठाम मत तुकाराम मुंढे यांनी एका वृत्तपत्राच्या मुलाखतीत मांडले आहे. इतकेच नाही तर, मी माझ्या तत्त्वांना तिलांजली दिली तर ते माझ्याच पाठीत मीच खंजिर खुपसल्यासारखे होईल असे मुंढे म्हणाले.

'मी नेमका काय गुन्हा केला होता की, माझी बदली करण्यात आली' असा थेट सवालही सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांनी उपस्थित केला आहे. सगळ्यात धक्कादायक म्हणजे, 'नागपुरात माझ्याविरोधात काही मिळेना म्हणून माझ्या चारित्र्याहिनाचे प्रकार घडवण्यात आले. महिलांना माझ्याकडे आणून कपडे फाडण्याचे प्रकार घडवले गेले' असा धक्कादायक खुलासा तुकाराम मुंढे यांनी केला आहे.

दररोज माझ्याविरोधात आरोप केले जात होते. मला ठरवून लक्ष केले जात होते. माझे मानसिक खच्चीकरण करण्याचा प्रयत्न झाला. असे सगळे कोण करणार? ही भाजपचीच लोकं होती? दुसरे कोण करणार? असा सवालही यावेळी तुकाराम मुंढे यांनी व्यक्त केला.

तुकाराम मुंढे हे सध्या कोरोनाबाधित असून नागपूरमध्ये क्वारंटाईन सेंटरमध्ये उपचार घेत असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यांच्या या खुलासांमुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. खरंतर, याआधी भाजपचे सरकार असतानाही मुंढे यांची वारंवरा बदली करण्यात येत होती.

 

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News