धक्कादायक! पुरुषांपेक्षा महिलांचे ६० टक्के केस गळणे वाढले; जाणून घ्या कारण

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 10 August 2020

केस गळण्याची अनेक कारणे आहेत त्यातील प्रमुख कारण म्हणजे असंतुलीत आहार, जेवणाच्या अयोग वेळा, ताण तणाव, कॉलरीज, हेअर डाय, स्ट्रेटनिंग, उष्णता देऊन केलेले हेअर ट्रिटमेंट केस गळतीला जबाबदार आहेत. 

बदलत्या जीवनशैलीमुळे केसांच्या अनेक समस्या निर्माण होत आहेत. पूर्वी केस गळतीचे प्रमाण पुरुषांमध्ये अधिक होते. केस गळतीच्या समस्या घेऊन ९० टक्के पुरुष केशतज्ज्ञाकडे जात होते. मात्र सध्या ६० टक्के महिला केस गळतीच्या समस्यापासून त्रस्त आहेत. त्वचा रोगतज्ज्ञाकडे केस गळतीच्या उपचाराठी महिला येत आहेत. केस गळण्याची अनेक कारणे आहेत त्यातील प्रमुख कारण म्हणजे असंतुलीत आहार, जेवणाच्या अयोग वेळा, ताण तणाव, कॉलरीज, हेअर डाय, स्ट्रेटनिंग, उष्णता देऊन केलेले हेअर ट्रिटमेंट केस गळतीला जबाबदार आहेत. 

केस गळतीचे प्रमुख दोन प्रकार

महिलांची केस गळती 

या प्रकारात महिलांचे केस थोड्या फार प्रमाणात गळतात. हळूहळू केस गळतीला सुरुवात होते आणि डोक्यावरचे केस पातळ होतात. तेव्हा केस गळतीला सुरुवात झाली असे समजावे. 

टेलोजन एक्लुवियम

अचानकपणे महिलांचे केस गळायला सुरुवात होतात, दररोज सरासरी शंभर केस गळतात. त्यामुळे अचानक टक्कल दिसायला लागते. 

केस गळण्याची प्रमुख कारणे

शरीराला दररोज १८०० कॉलरीज मिळणे आवश्यक असतात, त्यापेक्षा कमी कॅलरीज मिळाली तर केस गळती होते. त्याचबरोबर डेंगू, मलेरिया, चिकनगुणीया, टायफाय अशा आजारांमुळे केस गळतात. शरीरात विटामीन बी, विटामीन डी, आणि फेरीचीन याच्या कमतरतेमुळे केस खराब होतात. पॉलिस्टिक ओव्हरी सिंड्रोल आणि एंड्रोजन पुरुष हार्मोन्स याचे संतुलक बिघडल्यामुळे केसावर परिणाम होतो. त्यामुळे शरिरातील हार्मोन्स नियंत्रीत असले पाहिजे, यासाठी डॉक्टरांचा रोग्य सल्ला आणि उपचार केला पाहजे अशी माहिती त्वचाज्ज्ञ डॉ. सचिन धवल यांनी दिली. दिवसेंदिवस महिलांचे केस गळती सुरु राहिल्यास मानसिक संतुलन बिघडू शकते. त्याच्या परीणाम महिलाच्या जीवनावर होतो. केस गळती कमी करण्यासाठी संतुलीत आहार, दररोज वेळेवर जेवन, आहारात लोह, पालेभाज्या, दुग्धजन्य पदार्थ यांचा समावेश करावा.    

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News